भज गोविन्दम ॥१॥

Sunday, March 10, 2013

आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा ।

                                               आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा ।

जगात जेवढे सिद्ध आहेत त्या सर्वांच्या गुरुस्थानी भगवान श्री शंकर आहेत. शं . म्हणजे सुख आणि ते जो देतो तो शंकर आणि हा शंकर कसा आहे संतांच्या दृष्टीने शंकर भोला आहे ," शिव भोला चक्रवर्ती । त्याचे पाय माझे चित्ती ।। " भोला या शब्दाचा अर्थ ज्ञानी असा आहे कारण व्यवहारात आपण  भोळा म्हणजे बावळट  समजतो पण हा अर्थ चुकीचा आहे.कारण जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात ," तुका म्हणे  भोळा  । जिंकू जाणे  कळीकाळा ।।" आणि हा भोळा  महादेव तर काळाचाही काळ आहे. कारण भुते वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ।। आणि याच आदिनाथापासून सर्व विद्यांचा उगम आहे. शिवपुराण पहिले म्हणजे मग आपल्या लक्षात येईल कि शंकराची उपासन या देशात फार प्राचीन आहे. वैष्णव उपासना नंतरची आहे सर्वात अगोदर शिव उपासना आहे म्हणून तर आजही अफगाणिस्तान, चीन अगदी जगातील बहुतांश ठिकाणी शंकरची मंदिरे उत्त्खाननात सापडतात बऱ्याच  गावात  विष्णूचे मंदिर असेलच असे नाही पण शंकराचे मात्र मंदिर असतेच. हा बहुजनांचा देव आहे , असुरांचा सुद्धा आहे .  सर्वांचा आहे उपास्य देव आहे. म्हणून तर पंढरीच्या पांडुरंगाने आपल्या मस्तकावर " शिवलिंग " धारण केले आहे. व वारकरी साम्प्रदायचा संदेश आहे कि " हरी हरा भेद । नाही नका करू वाद ।। भेदकासी नाड  । एक वेलांटीच आड ।।" म्हणून वारकरी साम्प्रद्याने सोमवार आणि एकादशी हे दोन महत्वाचे व्रत मान्य केले आहेत. एकादशी व्रत सोमवार न करती । कोण त्यांची गती होईल नेणो ।। श्री तुकाराम महाराज . 
             ज्ञानदेवाची ज्ञानेश्वरी  जगात प्रसिध्द आहे असे ज्ञानेश्वर महाराज हे शैव संप्रदायी आहेत. त्यांच्या अमृतानुभवाचा अर्थ  हा शंकर तत्वज्ञानाप्रमाणे लावला म्हणजे आणखी स्पष्ट होतो. तात्पर्य शंकराला आपण आदिनाथ म्हणतो तो या अर्थाने सर्वांचा आदि आहे." तुम्ही विश्वनाथ । दिन रंक मी अनाथ ।।१।। कृपा कराल ते थोडी । पाया पडिलो बराडी ।।२।।" या शब्दात तुकाराम महाराज भगवान शंकराविषयी आदर प्रगट करतात. 
                त्यागुनी कैलास सर्वही संपती । श्मशानात वस्ती रुद्र करी ।।१।। कासया करणे ब्रह्म शोधावया । आलो कोठुनिया माझा मीची ।।२।। शंकर हि ब्रह्म विद्येची देवता आहे. मी कोण आहे ? मला कोठे जायचे आहे ? या सर्व प्रश्नंची उत्तरे याच अभंगात आहेत.   ब्रह्म सत्य आहे , जगत मिथ्या आहे मी ब्रह्म आहे, हा बोध होतो तो श्माषणात होतो कारण शरीराचे मिथ्यत्व येथे स्पष्ट दिसते. असो अशा सर्व विद्यांच्या  उद्गात्या परमेश्वराचे म्हणजेच आदिनाथाचे म्हणजेच महादेवाचे आज आपण ध्यान केले पाहिजे शिव्लीलामृताचा पाठ केला पाहिजे आणि महाशिवार्त्रीचे व्रत सुद्धा जरूर केले पाहिजे. 

       आपण सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा  ! जय शिव शंभो । ओम नम: शिवाय ।।

 श्रीगुरुदास 
-अशोकानंद महारज 
             

No comments: