भज गोविन्दम ॥१॥

Saturday, April 16, 2011

INSTANT संस्काराचा फंडा

INSTANT संस्काराचा फंडा 
आज  सकाळ वृतपत्रामध्ये श्रीराम जोशी यांनी नगर Today  मध्ये  सांस्कृतायांन मध्ये लिहिलेला लेख instant  संस्काराचा फंडा वाचला फार महत्वाच्या विषय हाताळला आहे .संस्कार हे विकत मिळत नाहीत .उन्हाळी शिबाराचा मोसम सुरु झाला आहे .शाळेला सुट्ट्या लागतील , आणि घरी मुले धुडगूस घालतील हा धिंगाणा सोसवत नाही म्हणून आई-वडील मुलांना या उन्हाळी शिबारात ५०० ते १०० रुपये भरून घालतील . कारण मुलांना संस्कार मिळाले पाहिजेत हा आजकालच्या सुज्ञ पालकाचा विचार . पूर्वी मामाच्या गावाला जायची तयारी परीक्षेच्या अगोदरपासून मुले करायची आता तसे राहिले नाही कारण मामा सुद्धा आता गावाकडे राहिला नाही तो नोकरीच्या निमित्ताने शहराकडे केव्हाच आलाय , गाव राहिले नाही यांत्रीकीकाराने खेड्याचे खेडेपण हरवल्यासारखे झाले आहे म्हणून नवी संश्रीती उदयाला येते आहे तिचे नाव आहे रिसोर्ट.....
           पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती घरामध्ये जुनी जाणती माणसे  , आजी आजोबा , काकी , काका , सर्व घरातच असायचे घरोघर भजन असायचे आजी आजोबा मुलांना संस्कार द्यायचे ..संध्याकाळ झाली कि आजी देव्हर्यात घरातील सर्व नातवंडाना एकत्र घेऊन समई लावून "शुभम करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा | " म्हणून घ्यायची आजोबा छान छान गोष्टी सांगायचे सर्व एकत्र असल्यामुळे जवळीक वाढायची प्रेम आपुलकी वाढायची आता परस्थिती बदलली आहे नवरा बायको दोघेही जॉब करीत असल्यामुळे घरात लहान मुलांना सांभाळण्यासाठी पगारी बाई असते किंवा पाळणा घर असते ..तिथे आईचे प्रेम कसे मिळणार ? लग्न झाले कि लवकरच वेगळे राहण्याची तयारी होते कारण या स्पर्धेच्या युगामध्ये भरपूर पैसे हवेत आणि ते मिळविण्यासाठी दोघांनीही जॉब केला पाहिजे ...अशा वेळी पाठीमागे त्या लहान मुलाचे काय होते हे आपण अनेक वेळा t v वर पाहोतच ..सासू सासरे अडगळ वाटते त्यामुळे म्हातारा म्हतारी गावाकडेच आणि हे शहराकडे ..कदाचित आजी आजोबा मुलांना काही शिकवायला लागले तर लगेच सुनबाई त्यांना म्हणार " तुमचे हे जुने संस्कार त्यांना लाऊ नका त्यांना आता MODERN   बनवायचे आहे ".  असो मग अशावेळी हे आधुनिक "सुज्ञ " पालक मुलांना तथाकथित संस्कार शिबिरामध्ये  घालतात . जिथे संस्कार देण्याचे पैसे घेतले जातात .जसा मोबदला तसा फायदा  हा हल्लीचा मंत्र आहे. 
                श्रीराम जोशी एक महत्वाचे सांगतात "संस्कार शिबिराची कल्पना चांगली असली व तेथे शिकविणारे सारे मनापासून मुलांवर संस्कार बिम्बाविण्याचा प्रयत्न करीत असले तरी जेव्हा असे संस्कार बाहेर विकत घेण्याची वेळ येते त्यावेळी घरात कोठेतरी संस्कार कमी झाल्याचे हे लक्षण म्हटले पाहिजे "  जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात " कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक | त्याचे हरिख  वाटे देवा ||" पण हे घडण्यासाठी कुळात व घरात हे संस्कार असावे लागतात ..ते आता दुर्मिळ होत चालले आहे वृद्धाश्रम हा पाचवा आश्रम झाला आहे पाळणा घर हे नवे गोकुळ झाले आहे आणि हे आता स्वीकार्ल्यावाचून गत्यंतर नाही.......कालाय तस्मै नाम: ||
अशोकानंद महाराज कर्डिले