॥भज
गोविंदम॥
श्रीमद आद्य शंकराचार्यांनी
बरिच स्तोत्रे लिहली काव्य कसे असावे याचा आदर्श वस्तुपाठच आचार्यांनी आपल्या
काव्यरचनेतून दाखवून दिले आहे.लालित्यपूर्ण रचना ,गेयता अर्थभरित आशय, लय व शब्दसॊंदर्य यामुळे
ती स्तोत्रे पटकन पाठ होतात. माउलि म्हणतात ,"वाचे बरवे कवित्व ।कवित्वी बरवे
रसिकत्व । रसिकत्वे परतत्व । स्पर्शु जॆसा ॥
याप्रमाणे आचार्याचे काव्य आहे.अल्प वयामध्ये चारहि वेदाचे अध्ययन करुन प्रकांड
पंडिताना वादविवादामध्ये हरवले. धर्मध्वज फडकत ठेवला. रुतंभरा प्रद्न्या प्राप्त
असलेला हा महात्मा वेदातील तत्वद्न्यान सहज काव्यात प्रगट करतो आहे आणि त्यांनी
केलेले स्तोत्रे आजहि लाखो लोकांच्या मुखोद्गत आहेत.
त्यातीलच एक स्तोत्र अतिशय प्रसिध्द आहे त्याचे नाव
चर्पटपंजारीका स्तोत्र आहे . चर्पट म्हणजे खमंग आणि पंजरी म्हणजे खाद्य. हे
स्तोत्र म्हणजे एक खमंग खाद्य आहे यात लालित्य ,ओज, भक्ती आहे. तसेच हे पाठ
करण्यास सोपे व मधुर आहे. मरण जवळ आले असता” डुकृञ् करणे “ असे व्याकरणाचे पाठ सुख देत नाहीत तेथे
गोविंदाला शरण जाणे हाच एक सर्वोत्तम उपाय आहे.
भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मुढ्मते ॥
संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुकृञ् करणे
भज गोविन्दं गोविन्दं
भज मुढ्मते ॥धृ ॥
एक म्हातारा मनुष्य
काशीमध्ये गंगेवर घाटावर व्याकरण घोकीत बसला होता,त्याच्या वयाकडे बघुन आचार्यांना नवल वाटले जेव्हा पाठ
पाठांतर करावयाचे होते त्या वयात केले नाहि "बालपण गेले नेणता । तरुणपणी विषयव्यथा ।
व्रुध्दपणी प्रवर्तली चिंता । मरे मागुता जन्म धरी ॥ आणि आयष्याचा शेवट आला आणि हा व्याकरण घोकित
बसला .खरे तर आता भगंताचे नाम घेणे श्रेयस्कर असतांना हा घोकीत बसला कि जे
आता पाठांतर होऊ शकत नाहि. म्हणुन आचार्य म्हणतात ,"जेव्हा भगवंताने नियोजित केलेलि वेळ
म्ह.म्रुत्युची वेळ येते तेव्हा तु पाठ केलेले व्याकरण तुझ्या रक्षणार्थ येणार
नाहित म्हणुन तु त्या गोविंदाचे भजन कर.
जगदगुरू श्री तुकाराम महराज एका अभंगात म्हणतात गोविंद गोविंद। मना लगलिया छंद॥१|। मग गोविंद ते काया ।भेद नाहि देवा तया ॥२ ||
खरे
तर माणुस आयुष्यभर शिकत असतो त्याला तसे वाटत नसते हा भग वेगळा ,उच्चविद्याविभुषित माणसास
वाटत असते कि आपलि विद्या आपणास तारिल, पण तसे घडत नाहि.उलट अहंकार आडवा येतो तो
अहंकार भावनेला स्थान देत नाहि, तो तर्कट वनवतो प्रेमभक्तिला पोषक राह्त नाहि त्यामुळे
समाधान मिळत नाहि.चार वेद, सतरा पुराणे , ब्रम्ह्सुत्रे, उपनिषदे संपादन केले परंतु
चित्ताची तळमळ शांत झाली नाहि त्यावेळि त्यांना श्री नारद महर्षि नारदांनी भगवान
श्रीक्रुष्णाच्या मधुर लिला वर्णन करायला सांगितले , त्याप्रमाणे त्यांनी लिला वर्णन केल्या त्यामुळे त्यांचे खरे
समाधान प्राप्त झाले. म्हणुन हे मानवा तु तर्कट बनण्यापेक्षा गोविंदाचे भजन कर.
भजन म्हणजे "भज-भजति म्हणजे भज-सेवया
म्ह.सेवा करणे भजन करणे. सेवा ते आवडी उच्चारावे नाम ॥ माउलि म्हणतात ," तेथ सेवा हा दारवंठा । तो
स्वाधिन करि सुभटा । वोळगोनि ॥ " भगवतप्रप्तिचा मार्ग म्हणजे "भजन
" प्रेमाने त्याला आळवणे.
तुम्हि करा घट पटा । आम्हि न वजो तया वाटा ॥
तु.म.
घट, पट, वगॆरे परिभाषिक शब्दांच्या जंजाळात आम्हि
अडकणार नाहि, कारण प्रेमाविण नाहि समाधान । ए.म.॥ म्हणुन हे जीवा तु गोविंदाचेच भजन करुन
भगवतप्राप्ति करुन घे.
मूढ जहीहि धनागमत्रुष्णाम।कुरू सदबुध्दि मनसि वित्रुष्णाम ॥
यल्लभसे निजकर्मोपात्तं ।
वित्तं तेन विनोदय चित्तम ॥२॥
भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुढमते॥ध्रु॥
आचार्य या श्लोकाच्या
आरंभालाच "मूढ" शब्दाने सुरवात करतात. मुर्ख लोक हे अद्न्यानी असतात , सकाम असतात त्यांना धनाची
संपत्तीची हाव असते. सारासार विचार त्यांच्या ठिकाणी नसतो.आशा लोकांना आचार्य
म्हणतात "हे मुर्खा ! (अद्न्यानी) हि धनत्रुष्णा तु सोडुन दे ! मनात सद्बुध्दि
सतत राहावी व या वित्रुष्णेपासून दुर राहा आणि जे तुझ्या कर्माने तुला मिळेल
त्यात तु समाधानी रहा.
भावगंध :- मुढ शब्दाचा
पातंजल योगशास्रामधे अर्थ दिलेला आहे.त्यात चित्ताचे- क्षिप्त चित्त,विक्षिप्त चित्त, निरुध्द चित्त, एकाग्र चित्त, चंचल चित्त, मुढ चित्त असे प्रकार
सांगितले आहेत." मुढ" चित्त म्हणजे ‘तमोगुणाने व्यप्त’ असलेले चित्त.अशा चित्ताच्या
माणसाला झोप जास्त असते." किर्तनी बसता निद्रे नागविले । मन हे गुंतले
विषयसुखा ॥ना.म.॥ मुढ चित्ताच्या व्यक्तिला श्रवणात गोडि उत्पन्न होत नाहि. पण
प्रापंचीक गप्पा, पॆशाची चर्चा निघाल्या कि मग
मात्र हा सावध होतो. धनाचा लोभ त्याला स्वस्थ बसू देत नाहि. श्रीमदभागवत ११वा
स्कंधामधे कदर्यु आख्यान आहे. हि कदर्यु ब्राह्मण
इतका कंजुस असतो की त्याच्या घरातधान्याचे कोठारे भरलेली असुनहि मुंगीला
उपवास , उंदराला लंघन घडत होते.घरच्या
लोकांना ताजे अन्नहि मिळु देत नव्हता एव्हढा धनलोभी होता. कालाच्या ओघात त्याचे
होत्याचे नव्हते झाले व नंतर त्याला विरक्ति झाली व त्याने त्याने धनाचे नश्वरत्व
सांगितले . तो म्हणतो धनाच्या मागे १५ अनर्थ आहेत .काम. क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर आदी अनेक विकार फक्त
धनामुळे येतात. ज्याच्याजवळ धन असते असा मनुष्य अतिशय अहंकारि असतो त्याला वाटते
तो धनाच्या बळावर काहिहि प्रप्त करू शकतो जगद्गुरू श्री तुकाराम महाराज फार सुंदर
सांगतात " धनमान बळे नाठविसी देवा ।म्रुत्युकाळी तेव्हा कोण आहे ॥"
किंवा तुका म्हणे धन ।धनासाठी देती प्राण ॥ धन मिळविण्यासाठी नरबळी दिल्याच्या
घटना आपण पेपरमध्ये वाचतो. आता भरपुर पॆसे मिळाले असे कधीच कोणाला वाटत नाहि.
धन दारा पुत्र जन । बंधु
सोयरे पिशुन ।सर्व मिथ्या हे जाणुन । शरण रिघा देवासी॥ ना.म.।
हे
सर्व मिथ्या "जाणुन" या शब्दाला महत्व आहे, धन टाकायचे नाही तर ते
मिथ्या, नष्ट होणारे आहे असे जाणुन
त्याचा विनियोग करायचा. "वेचोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच
करी ॥" त.म. अशा पध्द्तीने धनाचा
वापर केला तर ते धन तारक ठरते नाहि तर तेच धन मारक ठरते.
"म्हणे आजि मिया । संपत्ती
बहुतेकाचिया । आपुल्या हाती केलिया। धन्य ना मी ॥ माउली॥ धनत्रुष्णा मोठि वाईट
आहे. असा माणुस कंजुस असतो विधायक कामासाठि कधी वर्गणिही देणार नाहि उलट
"उष्ट्या हाते नुडवी काग ॥" उष्ट्या हाताने तो कावळा सुध्दा उड्वीत नाही
कारण हातातील शिते जर कावळ्याला मिळाले तर ?!!!
येथे येउनि केलेसी कायी ।
विठ्ठ्लु नाहि आठविला ॥१॥
अहा रे मुढा भाग्यहिना। गेलासी पतना मोह
भ्रमे ॥२॥
तात्पर्य अशा व्यक्तीला मुढ म्हणतात. म्हणुन
आचार्य फार सुंदर उपाय सांगतात. ते म्हणतात अरे! जीवा तु मनात सद्बुध्दी , विरक्ति, निराभिलाषी होण्याचा प्रयत्न
कर.व्यवहार सोडायला ते सांगत नाहित फक्त अलिप्तपणे व्यवहार करायला
सांगतात."पद्मपत्रमिवांभसा " कमळाचे पान पाण्यात असते परंतु ते त्या
पाण्यात लिप्त होत नाहि. "मग मी व्यवाहारी असेन वर्तत । जेवी जळाआत
पद्मपत्र ॥तु.म.॥ ह्याप्रमाणे जीवनात राहिले
तर समाधान प्राप्त होते.
प्रतेकाला त्याच्या
कर्मानुसार फल मिळत असते. " मना त्वाचि रे पुर्व संचित केले । तयासारिखे
भोगणे प्राप्त झाले ॥ श्री रामदास स्वामी ॥ कर्मानुसार संचित होते व
संचितच पूढे प्रारब्ध म्हणुन भोगायला प्राप्त होते. प्रारब्धेचि
जोडे धन । प्राब्धेचि वाढे मान ॥ १॥ प्रारब्धेचि भरे पोट । तुका करिना बोभाट
॥ ज्याप्रमाणे
आपण कर्म करु त्याप्रमाणे जर घडत असेल तर आता दोष कोणाला द्यावा? म्हणुन "तुका म्हणे
आता देवा का रुसावे । मनासि पुसावे काय केले ?॥"
कलियुगात सर्वात सोपा मार्ग म्हणजे
नामस्मरण . शुध्द चित्त करुन जर नामभक्ति केलि तर सहज अत्यंतिक समाधान
प्राप्त होऊन मोक्ष प्राप्त होतो.म्हणुन" ठेविले अनंते
तॆसेची राहावे । चित्ती असु द्यावे समाधान" ॥ हे श्री
तुकाराम महाराजांचे म्हणने किती सार्थ आहे हे पटते. संतांनी जगाला आळसी न बनवता
मानसीक समाधान(Satisfaction of mind) कसे
प्राप्त करावे हे सांगीतले व सुखी संसाराची गुरूकिल्ली आपल्या हातात दिली आहे.
नारीस्तनभरनाभिनिवेशं
मिथ्यामायामोहावेशम
एतन्मांसवसादिविकारं मनसि विचारय वारंवारम॥३ ||
श्री
शंकराचार्य म्हणतात " अरे मूढा ! स्त्रि देह म्हणजे स्तन अथवा नाभीदेशच का ?ते शरिर पाहुन मोहावेशाने
त्यात तू गुंतून पडू नकोस, कारण हा देह हे अवयव म्हणजे
मांस पेशींचा समूह आहे. याविषयी लोभ बाळगु नकोस. शरिर म्हणजे मांसाच गोळा
आहे या देहाकाराला भुलु नकोस मनात वारंवार विचार कर, उगाच विकारवश होऊ नकोस -
गोविंदाचे स्मरण कर.
जगदगुरु
श्री तुकाराम महाराजांचा एक मोठा मार्मिक अभंग आहे ते म्हणतात,
साधकाची
दशा उदास असावी ।
उपाधि
नसावी अंतर्बाह्य ॥१॥
एकांति
लोकांती स्त्रियांसी भाषण।
प्राण
गेल्या जाण बोलु नये ॥२॥
स्त्रीदेह वाईट नाही तर त्या
देहाविषयी असणारि आसक्ती वाईट आहे.खरे तर प्रतेक साधकाच्या साधनेत बाधा निर्माण
करित असते. असे अनुभव प्रतेक संताचे जिवनात आलेले आहेत. तुकाराम महाराजांचे जिवनात
काहि कंटकांनी मुद्दाम जाणीवपुर्वक विघ्न आणले होते. एका स्त्रिला माहाराजांकडे
पाठविले पण ! महाराजांनी संयमाने तिला उत्तर दिले," जाई वो माते न करि सायास
।आम्हि विष्णुदास तॆसे नव्हो ॥" आतुन आसक्ति जर गेली तर स्त्रि काहि करित नाहि
कारण कोणताहि विषय आगोदर अंत:करणात उत्पन्न होतो मग तो इंद्रियाद्वारे तो
विषयापर्यत जाउन भोग भोगित असतो. विषय अंत:करणातच उत्पन्न झाला नाहि तर तो
भोगण्याची ईच्छाच निर्माण होत नाही . संत म्हणतात ," निद्रितापासी / साप तॆसी
उर्वसी ॥"
स्त्रि
हि तपस्वी योग्याचीहि तपश्चर्या भंग करते हे खरे नाहि तर तिच्याविषयी असणारि
भोगवासना, आसक्ती तपश्चर्या भंग करते श्री संत
एकनाथ महराज भागतात फ़ार छान सांगतात.
वेदे
न करिता प्रेरणा । विषयावरी सहज वासना । स्वभावे सकळ जना । सदा जाण सर्वासी ॥२०८॥
मांससवना
मद्यपाना । मिथुनीभुत मॆथुना । ये अर्थी सर्व जना । तीव्र वासना सर्वदा ॥२०९॥
आवरावाया
योनिभ्रष्टा ।मॆथुनी विवाह प्रतिष्ठा ।लावूनिया निजनीष्ठा । वर्ण वरिष्ठा नेमिले
॥२१९॥
ब्राह्मण
जाता रजकीपासी । ते तव कडु न लागे त्यासी । रजक जाता ब्राह्मणीपासी । तिखट त्यासी
तेन लगे ॥२२० ॥अ.५वा॥
नातिस्नेह:
प्रसंगॊ वा कर्तव्य: क्वापि केनचित।...अ.१७/श्लो.५२॥ यावर श्री नाथ महाराज भाष्य
करतांना म्हणतात-,"संसारदु:खाचे मूळ ।
स्त्रिआसक्तिच जाण केवळ ।स्त्रिलोभाचे जेथ प्रबळ बळ । दु:ख सकळ त्यापासी
॥५४७॥आसक्ति आणि स्नेहसूत्र । या दोन्हीपासाव द:खासी पात्र । संसारी नर होताती
॥५४८॥ दु:खाचे खरे मुळ म्हणजे
आसक्तिच आहे म्हणुन आसक्तिचा नाश करायला सांगितले आहे. पंचदशीमध्ये दोन स्रुष्टि
सांगितल्या आहेत १/- ईश स्रुष्टि २/- जीव स्रुष्टी जीव स्रुष्टि दु:खाला कारणीभुत
असते. ईश निर्मित स्त्री दु:ख देत नाहि तर "माझी" स्त्रि दु:ख
देते. माझेपणा आला कि दु:ख होते. व आसक्ति जर जावी असे वाटत असेल तर जन्म जरा
व्याधि दु:ख दोषानुदर्शनं॥
वॆराग्याशिवाय
आसक्ती जाणार नाहि आणि वॆराग्य हवे असेल तर भोगातील दोष कळावेत दोष कळाले की
वॆराग्य होत असते.भर्त्रुहरी शतकामध्ये श्लोक आहे तो म्हणतो---
स्तनौ
मांसग्रन्थी कनककलशावित्युपमितौ,
मुखं श्लेष्मागारं तदपि च शशांकेन तुलितम ।
स्त्रवन्मूत्रक्लिन्नं
करिवरकरस्पर्धि जघन-
महो निन्द्यं रुपं कविजन विशेषॆर्गुक्रुतम ॥
स्तन म्हणजे मांसाचे गोळे
त्याला कलश , लाळेने भरलेले तोंड त्याला
मुखचंद्रमा आणि मुत्राने भरलेल्या जांघांना गजेंद्राची सोंड म्हणणा-या
कविच्या अद्न्याचा विस्मय होतो.
स्त्रि हि उपभोग्य वस्तु म्हणुन अवमुल्यान केले
परंतु श्री शंकराचार्यांनी त्याला सुंदर अर्थ प्रदान केला आहे.स्त्रि म्हणजे माता, देवी या रुपात ते
पाहातात.अन्न्पुर्णास्तोत्र , भवान्यष्टक ,देव्यपराधक्षमापन इत्यादि स्तोत्र हि उत्तम
उदाहारणे आहेत " गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका
भवानि"॥ किंवा " कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥" मातेचा अशा प्रकारे गौरव
क्वचितच कुठे केला गेला असेल. स्त्रि हि भोगवस्तु
नसुन ति पुरुषांच्या बरोबरिने नव्हे तर काकणभर पुढेच आहे. खरे तर पुरुषापेक्षा
तीची शक्ती जास्त म्हणावी लागेल कारण ती जन्म देउ शकते., उत्पत्ती करु शकते.
स्त्रिशिवाय पुरुष अपूर्ण आहे. शिव-शक्ति दोन नाहित, पुरुष-प्रक्रुती दोन नाहित(अनुभवाम्रुताचे
पहिले ५ श्लोक वाचावेत)
दया क्षमा, ध्रुती आदी सात शक्ती विभुतींचे गीतेतील
वर्णन वाचले कि मग स्त्रिची महती लक्षात येते . आज स्त्रिजीवनाचे जे विक्रुत
चित्रण केले गेले आहे त्याला काहि अंशी स्त्रिया सुध्दा जबाबदार आहेत. विक्रुतीलाच
संस्क्रुती म्हणन्याची वाइट पध्द्त अस्तित्वात आली आहे. नग्नतेलाच सौदर्य समजण्यात
धन्यता मानतात. विक्रुत जाहिरातींना स्त्रियांनी प्रतिसाद न देता मर्यादेतील सौदर्याचा सन्मान केला
पाहिजे. असे जर होइल तर समाजात सुखी समाधानी समाज अस्तित्वात येइल आणि
गुन्हेगारि प्रव्रुत्ति नष्ट होतील.
यावव्दित्तोपार्जनसक्तस्तावन्निजपरिवारो
रक्त: ।
पश्चाध्दावति जर्जरदेहे वार्तां प्रुच्छति कोपि न
गेहे ॥५ ||
भज गोविंदमभज गोविंदमभज गोविंदम मुढमते.... ॥ध्रु॥
श्रीमदशंकराचार्यांनी या श्लोकात
एक महत्वाची बाब स्पष्ट केली आहे ती म्हणजे ,"सब पैसेके भाई, अपना कोई नहि ।" पैशाची जादु उभ्या जगावर चालते, पैसा नसेल तर कोणतेहि कार्य
करणे अवघड आहे. “अर्थस्य पुरुषो दासः
दासस्त्वर्थो न कर्हिचित्। इति सत्यं महाराज! बद्धोऽस्म्यर्थेन कौरवैः।' महाभारतात भीष्माचार्य धर्मजला म्हणाले होते, सर्व
जग अर्थाचे (पैसा) दास आहेत अर्थ कोणाचा दास नाही म्हणूनच मी नाईलाजाने का होईना
कौरवांच्या बाजूने बांधला गेलो आहे.” परमार्थातहि धनावाचुन काहि होत नाहि. आणि आता
तर एक वेगळेच फ्याड आले आहे ते म्हणजे देवाच्या दरवाज्यावर सोन्याचा मुलामा, देवाचे सिंहासन सोन्याचे, मखर सोन्याचे, विशेष म्हणजे देवाचा मुकुट
सोन्याचा आणि तोही १४-१५ किलो वजनाचा, बरे हे सर्व एक वेळ ठिक आहे असे समजु परंतु
त्या सोन्याच्या रक्षणासाठि पाहारेकरि पाहिजेत म्हणजे ज्या देवाला आपण रक्ष माम परमेश्वर ॥ म्हणायचे त्यालाच संरक्षण हवे. ख-या परमार्थाचिया चाडा । कोणी वेचिना कवडा ।
भुल कैसी पडली मुढा । रोकडा परमार्थ विसरले ॥(लघुवाक्यव्रुत्ती-)
भारतीय संस्कृतीमध्ये धन हा दुसरा
पुरुषार्थ (धर्म-अर्थ-काम-मोक्ष) म्हटले आहे पैसा मिळवु नये असे नाहि, मिळवावा पण तो योग्य मार्गाने मिळवला पाहिजे.
श्री तुकाराम महाराज म्हणतात -
"वेचोनिया धन उत्तम व्यवहारे
। उदास विचारे वेच करी॥" सरळ मार्गाने पैसा कमावावा. व योग्य विनियोग
करावा.
अवास्तव चैन, हौस भागविण्यासाठि धन आवशक वाटते आणि ते
मिळविण्यासाठि वेगवेगळे मार्ग अवलंबिले जातात. बरे हे सर्व कोणासाठि ? तर हे सर्व "माझ्या
कुटुंबासाठि, ज्यांना मी माझे म्हणतो त्या
माझ्या सगे-सोय-यांसाठि करायचे.
“ जववरि बरवा चाले धंदा । तववरि बहिण म्हणे
दादा॥“ पैसे असले तरच बहिणसुध्दा
मान देते गरिब भावाकडे जाणार नाहि."मायबापे पिंड पाळियेला माया | जन्म मरण ज्या संत संग ||तु. म. ||” मायेच्या पोटि, लोभाचे पोटि सर्व नातेवाईक जवळ येत असतात. "सोयरे धायरे ,दिल्या घेतल्याचे ।
अंतकाळिचे नाही कोणी ॥तु.म.॥जोवरि पैसा तोवरि बैसा हि म्हण खरि आहे. श्रीमंत
मनुष्य आला तर त्या ठीकाणी कितीही मोठा विव्दान उपस्थित असला तरि त्याला मान
न मिळता तो श्रीमंत माणसाला मिळतो व विव्दानाची उपेक्षा होते. पतिरव्रतेच्या गळ्यात धोंडा
। वेश्यांना मणीहार । उध्दवा अजब तुझे सरकार.... “धनवंताघरि धनचि काम करि॥“
तु.म. || श्रीमंताचे घरी पैसाच काम करित
असतो. पैशामध्ये अशा वेगवेळ्या प्रकारच्या शक्ति आहेत म्हणुन पैशाची ताकद ओळखुन
माणसाने योग्य नियोजन केले तर हाच पैसा त्याला तारणारा ठरणार आहे. त्यातुन त्याला
चांगले काहि करता पण येणार आहे. म्हणुनच श्रीमद शंकराचार्य म्हणतात ," हे मानवा ! जोवर तुझ्यामध्ये
धन कमावण्याची शक्ति आहे तोपर्यंतच तुझ्या घरातील तुझे आप्त तुझ्यावर फ़ार प्रेम
करतात, तुझी विचारपुस करतात पण !
त्यानंतर तुला म्हातारपण आल्यानंतर देह जर्जर झाला , काम करण्याची शक्ति संपली की घरात तुझा
कोणालाहि उपयोग नसतो मग तुझी कोणीहि विचारपुस करित नाहित त्यांना तु नको असतो तुझा पैसा हवा असतो." श्री तुकाराम महराज
म्हणतात ," इंद्रिये मावळलि म्हणती आला
बागुल आजा "। म्हातारा मनुष्य म्हणजे घरातील नातवांचे खेळणे होऊन बसते.
तारुण्यात शक्ती असते त्यामूळे माणुस म्हणतो की ," लाथ मारिन तिथे पाणि काढिन "पण! एकदा का आयुष्य उतरणीला लागले कि शरिर थकते, त्यामध्ये रोग प्रवेश करतात, बुध्दिसुध्दा कमजोर होते , विसराळुपणा वाढतो, प्रक्रुती चांगली राहत नाहि, वारंवार वैद्याकडे जावे
लागते ,शेवटी त्याचाहि कंटाळा येतो
आणि औषधेहि नको म्हणतो अशावेळी त्याची शारिरिक व मानसिक स्थिती ढासळते मग घरातिल
लोकांना त्याचा उद्वेग येतो त्याला दडपण येते भितीने ग्रासला जातो . खरे तर
अशावेळी त्याला मदतीची , समजुन घेण्याची गरज असते.पण
! होते सारे उलटेच त्याला तर कोणी समजुन घेत तर नाहितच पण तो सुध्दा समजुन वागत
नाही म्हणुन Generation
Gap सुरु
होते. हे एवढे घडुनहि त्याला
गोविंदाचे भजन करण्याची बुध्दि होत नाहि हे त्याचे दुर्दैव आहे.
जो परिवार त्याला पैसे असतांना प्रेमाने विचारत
होता तोच परिवार आता त्याला धनाच्या अभावामुळे, शरिराच्या शक्तिहिनतेमुळे त्याच्याशी बोलतहि
नाहित त्यामुळे वार्धक्य न टळणारि गोष्ट आहे , हे जर आपल्याला माहित असेल तर त्याची तजविज
आगोदरच का करु नये ? बालपणापासुनच परमार्थाची सवय
लावुन घेतली पाहिजे म्हणजे मग जरि प्रतिकूल परिस्थिति आली तरि आपला तोल जाणार नाहि
. सुखदु:खे समे क्रुत्वा लाभा
लाभो जया जयौ ॥ हे गीतेचे तत्वद्न्यान समजुन घेतले कि मग
कोणत्याहि परिस्थितीत आनंद भंग होत नाहि आणि शेवटी फक्त गीवंद नामानेच संधान
वाटणार आहे म्हणून तु “ भज गोविन्दम भज गोविन्दम “
जटिलो मुण्डी लुंचितकेश: काषायाम्बरबहुक्रुत वेष : ॥
पश्यन्नपि
च न पशति मूढ उदरनिमित्तं बहुक्रुतवेष : ॥ ६||
भज गोविंदमभज गोविंदमभज
गोविंदम मुढमते.... ॥ध्रु॥
दांभिकता हि फार पुरातन
कालापासुन चालत आलेली आहे. सत्य-असत्य हा सापेक्ष धर्म आहेच. धर्माचा खरा
अर्थ न समजता आपल्या पोटासाठि धर्माचे सोंग घेतलेली माणसे आजही कमी नाहित.
अंधश्रध्देचे बळी ह्याच लोकांमुळे होत असतात. परमार्थाचा खरा अर्थ कळलेला नसतो आणि
सोंग मात्र करतात. "पानी पिना छानके और गुरु करना जानके " अहो ! बाजारात
गेल्यानंतर माणुस मडके घ्यायचे असेल तर ते वाजवून घेतो मग गुरु करायचा तर तो
आंधळेपणाने कसा करावा ? जगात भोंदु लोकांचा भरणा तर
भरपुर आहे. जगदगुरु श्री तुकाराम महारांजाच्या काळातहि असे भोंदु लोक होतेच , महाराजांनी अशा लोकांच बुरखा
फाडला आहे ते त्यांच्याच शब्दात पाहु..
लांबवुनि
जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोठा करिताती ॥१॥
सर्वांगा
करिती विभुती लेपन । पहाताती मिष्टान्न भक्षावया ॥२॥
किंवा.
दाढि
डोई मूंडी मुंडूनियां सर्व । पांघुरती बरवी वस्रे काळे ॥१॥
उफराटी
काठी घेउनियां हाती । उपदेश देती सर्वत्रासी ॥२॥
किंवा
ऎसे
कैसे झाले भोंदु । कर्म करोनि म्हणती साधु ॥१॥
अंगा
लावुनिया राख । डोळे झांकुनि करती पाप ॥२॥
किंवा
ऎसे
संत झाले कळी । तोंडी तंमाखुची नळी ॥१॥
स्नान
संध्या बुडविली । पुढे भांग वोढवली ॥२॥
भांग
भुर्का हे साधन । पची पडे मद्यपान ॥३॥
तुका
म्हणे अवघे सोंग । तेथे कैचा पांडुरंग ॥४ ॥
वरील
अभंगाचा विचार केला तर लक्षात येते कि लोक डोक्याचे केस वाढवतात, दाढी वाढवतात, भगवे कपडे घालतात, " मिथ्याचार स उच्चते " व
लोकांना फसवतात, असे हे साधु(कु) कर्म करुन , विषय भोग भोगुन , अंगाला राख लावून पाप करतात
आचार्यांनी नेमके वर्मावर बोट ठवले दांभिकतेवर त्यांनी सुंदर विचार मांडले.
जसे गुण कळावे तसे अवगूण सुध्दा कळावे लागतात. कारण दोष जर कळले नाहि तर ते
(दोष) टाकता येत नाहित. आचार्यांनी समाजाला भोंदु, दांभीक साधु कळावे म्हणुन
त्यांनी" जटिलो मुण्डी लुंचितकेश:
काषायाम्बरबहुक्रुत वेष : ॥पश्यन्नपि च न पशति मूढ उदरनिमित्तं बहुक्रुतवेष : ॥" ह्या श्लोकाद्वारे स्पष्ट
केले आहे. बुडते हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनिया ॥ ह्या
तुकोक्तिप्रमाणे समाजाची आचार्यांना दया आली आणि त्यांनी पोटासाठी "बहुक्रुत
वेष " नाना वेष करुन समाजाची दिशाभुल करतात. यामुळे समाज अधोगतीस जातो.
समाज आचार-भ्रष्ट , विचार-भ्रष्ट, धर्म-भ्रष्ट ,होतांना संतानी पाहीला आणि
त्यांना ते बघवले गेले नाही म्हणुन त्यांनी समाज प्रबोधन केले. "उजळावया आलो
वाटा । खरा खोटा निवाडा ॥" ख-या-खोट्याचा निवाडा करण्यासाठि आम्ही आलो आहोत.
माउली ज्ञानोबाराय म्हणतात ," तापत्रये तापली गुरुते गिवसीती
। भगवा देखोनी म्हणती तारा स्वामी ॥ ".लोक त्रिवीध तापाने पोळलेले असतात
त्यांना कुठेतरी समाधान हवे असते, मग ते लोक भोंदु साधु , भगव्या वेषधारि साधुला खरा
साधु समजतात व त्याला शरण जातात आणि तो त्यांना फसवतात , म्हणुन संत समाजाला विचार
देउन जागे करण्याचा प्रयत्न करतात, प्रबोधन करुन समाज जाग्रुती करुन फार महत्वाचे
काम संतानी केले आहे. सदाचारसंपन्न समाज धडवण्यात संताचे फार मोठे योगदान आहे.
त्यांचे समाजावर फार मोठे उपकार आहेत. जगदगुरु श्री
तुकाराम महाराज म्हणतात," काय सांगो आता संताचे उपकार
। मज निरंतर जागविती ॥" धर्म जागृती , कर्म जागृती, उपासना जागृती , नाम जागृती, तीर्थ
जागृती, अशा अनेक प्रकारच्या जागृती आहेत तथापि सर्वात
महत्वाची म्हणजे आत्म जागृती संत करीत असतात त्यामुळेच या जगाला खरे मार्गदर्शन
होत असते.
नलिनीदलगत
जलमतितरलं तद्वज्जीवितमतिशयचपलम् ।
विद्धि व्याध्यभिमानग्रस्तं लोकं शोकहतं च समस्तम् ॥
भज गोविंदमभज गोविंदमभज गोविंदम मुढमते.... ॥ध्रु॥ ७ ||
कमलापत्रावरील
जलबिंदू अतितरल म्हणजे अतिशय अस्थिर , चंचल असतो
. त्याचप्रमाणे जीवनही अस्थिर असते असे जाण सर जग रोग आणि अहंकार व शोकाने ग्रस्त
झालेले आहेत असे जाणावे..
श्रीमदआद्य शंकराचार्यांचे
वांगमय प्रासादिक तर आहेच पण जीवाला जागृत करणरे आहे. वरील श्लोकामध्ये एक सुंदर
असा विचार आचार्यांनी मांडला आहे . जीवन हे क्षणभंगुर आहे या करीता त्यांनी
कमल्पत्रचा दृष्टांत दिला आहे . कमल पत्रावरील पाण्याचा थेंब हा स्थिर राहत
नाही कारण ते पान अतिशय मऊ असते पाणी सुद्धा त्यावर ठरत नाही. आपले जीवनही तसेच
आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणतात “क्षणभंगुर नाहीं भरवसा । व्हा रे सावध सोडा माया
आशा ।न चळे बळ पडेल मग फासा । पुढें हुशार थोर आहे वोळसा गा ॥३||राम राम स्मरा आधीं ।|”
जीवन अतिशय क्षणभंगुर आहे याची
शाश्वती नाही . “ येथे नाही उरो आले हरिहर
अवतार | येर ते पामर जीव किती || तु.म. || जे भगवंताचे अवतार झाले ते
सुद्धा राहिले नाही त्यांना सुद्धा देह सोडवा लागला त्यामुळे बाकीच्या जीवांची काय
कथा . “ खबर नाही इस जुगमे पलकी को जाने कलकी ?|| “उद्याचे काय घेऊन बसलात ? ताटातील घास ओठात जाईल कि
नाही व ओठातील घास पोटात जाईल कि नाही याची सुद्धा खात्री नाही . एक सुंदर
दृष्टांत आहे एकदा काय झाले धर्मराजा काही पर्वकालानिमित दानधर्म करीत होता दिवसभर
त्याने हजारो याचकांना दान दिले . संध्याकाळी शेवटी एक याचक आला व धर्माजा त्याला
म्हणाला कि तू आता उद्या ये वेळ संपली . भीम तेथेच होता तो लगेच नगारखान्यात गेला
आणि जोरजोरात नगारा वाजवू लागला त्याला काय आनंद झाला म्हणून धर्मराजा त्याच्याजवळ
गेला आणि म्हणाला “ अरे ! भीमा तुला कसला आनंद
झाला म्हणून तू हा नगारा वाजवतोस ? “ भीम म्हणाला ,” दादा थोडा वेळ थांबा मला फार
आनंद झालाय वाजवू द्या मला नगारा .”
“अरे पण भीमा मला सांग तरी
तुला कोणता आनंद झाला” तेव्हा भीम म्हणाला ,” दादा तुम्ही उद्या सुद्धा
जिवंत आहात . यापेक्षा कोणता आनंद असू शकतो ? कारण तुम्ही त्या याचकाला म्हनालात कि तू उद्या
ये आता वेळ संपली म्हणजे तुम्हाला उद्याची खात्री आहे म्हणून मला आनंद झाला .” हे ऐकल्यावर लगेच धर्मराजाने
त्या याचकाला बोलावून घेतले आणि त्याला इच्छित दान दिले कारण त्याच्या लक्षात आले
कि उद्याचे काहीही खरे नाही.
आचार्य त्यासाठी
कामालपत्राचे उदहरण देतात व जीवनाचा गहन अर्थ सांगतात. आणखी पुढे सांगतात कि हे
जीवन रोगग्रस्त आणि अहंकाराने भारलेले आहे मदलसेने आपल्या मुलाला उपदेश करतांना
म्हटले कि ” हा देहो नाशिवंत मळमुत्राचा
बांधा । वरी चर्म घातलें रे कर्म कीटकाचा सांदा ।रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा
बांधा । स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा ॥५॥ या देहाचा भरंवसा पुत्रा न धरावा ऎसा । माझें माझें
म्हणोनियां बहु दु:खाचा वळसा ।बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा । तृष्णा ते सांडुनियां
योगी गेले वनवासा ॥६॥ “
हा देह नाशिवंत आहे , या देहात मल , मूत्र, भरलेले आहे या देहाची
दुर्गंधी येते या देहात रोग,व्याधी असतात. हे बालका तू या देहाचा भरवसा धरू नको व माझे माझे म्हणून
या देहाचे तादात्म्य धरू नको हे जीवन दुख:मय आहे. भगवान गौतम बुद्ध सुद्धा सांगतात ,” दुखं दुखं क्षणिकम क्षणिकम “ सर्व दुखमय असून क्षणिक आहे
आणि अशा या देहाचा जीवाला किती अहंकार असतो सारखा मी मी , माझे माझे करीत असतो एक दिवस
हे सगळे सोडूनच जावे लागेल .
आएगा जब रे बुलावा हरी का
छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा
नाम हरी का साथ जायेगा
और तू कुछ न ले पायेगा
आएगा जब रे बुलावा हरी का छोड़ के सब कुछ ...
हे जीवनाचे सत्य सार आहे व
याचा विचार जीवाने केला तर सहज परमार्थात त्याचा प्रवेश होईल यात शंका नाही.
यावत्पनो निवासति गेहे तावतपृच्छति कुशलं गेहे |
गतवती वायौ देहापाये, भार्या बिभ्यति तस्मिन काये ||
भज गोविंदमभज गोविंदमभज गोविंदम मुढमते.... ॥ध्रु॥ ८||
या श्लोकात जीवनातील वास्तव
प्रतिपादन केले आहे जोपर्यंत या देहात प्राण आहे , श्वास आहे तोपर्यंतच तुमची
घरातील लोक विचारपूस करतात. एकदा का तुमच्या शरीरातील प्राण ,श्वास निघून गेला कि मग या देहाला घरात कोणी ठेवीत
नाहीत. लवकरात लवकर घराबाहेर काढतात व स्मशानात नेवून त्याचे दहन करतात. जीवनभर
कितीही तुमच्यावर प्रेम केलेले असू द्या प्रेतरूप शरीराला घरात ठेवीत नाहीत इतकेच
काय तर जी पत्नी आयुष्यभर तुमच्यार प्रेम करते ती सुद्धा त्या प्रेताला हात लावीत
नाही उलट ती घाबरते . आणि समजा ठेवले तरी
त्यामध्ये चैतन्य येत नाही ते प्रेत जिवंत होत नाही. हजारो वर्षापूर्वी
इजिप्तमध्ये पिर्यामिडमध्ये राजे लोकांचे देह ठेवण्याची प्रथा होती व त्याबरोबर
दाग दागिने ठेवायचे त्याच्या आवडत्या वस्तू ठेवायचे पण आता संशोधन झाले आणि ते
पिर्यामिड खोदून बघितले तर त्या ममी म्हणजे जतन केलेले प्रेत तसेच होते ते काही
जिवंत झालेले दिसले नाही. तात्पर्य जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंतच लोक या
देहाला जपतात नंतर कोनही विचारीत नाही हे वास्तव आहे पण याचा कोणी विचार करीत
नाही. एके ठिकाणी फार छान सांगितले आहे ,” ऐक चतुरा सोड फुगारा उत्तम नरदेही, भरला मायेचा बाजार जगामध्ये
आपल कोणी नाही. ||” या मायेच्या बाजारात आपले
कोणी नाही फक्त आपले आहेत असे भासते.श्री संत ज्ञानोबाराय म्हणतात,” मातापिता बंधु बहिणी कोणी न
पवती निर्वाणी।इष्टमित्रस्वजनसखे हे तो सुखाची मांडणी। एकला मी दु:
ख भोगी कुंभपाक जाचणी |। तेथे कोणी सोडविना एका
सदगुरुवांचुनी॥धर्म जागो सादैवाचा जे बा परोपकारी ||”
अंतकाळी
कोणीही वाचवू शकत नाही फक्त एक सद्गुरूच वाचवितात म्हणजे ते काही जिवंत करीत नाहीत
पण मृत्य सुकर करतात व या देहाचे मिथ्यत्व पटवून देतात. त्यामुळे देह सोडतांना
सुद्धा दुख: होत नाही उलट हा देह माझा नाही हे कळते. देह पंचमहाभूतांचा आहे. देह
कोणाचाच या इहलोकात राहू शकत नाही. श्री ज्ञानोबारायांनी मदालसा नावाच्या सुंदर
प्रकरणातील अभंगात देहाचे मिथ्यात्व पर्तीपादन केले आहे ते म्हणतात ,” हा देहो नाशिवंत मळमुत्रांचा बांधा | वरी चर्म घातलें रे कर्म
कीटकांचा सांदा |रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा
बांधा | स्मरे त्या हरिहरा शरण जाई
गोविंदा ||५||या देहाचा भंरवसा पुत्रा न धरावा ऐसा | माझें माझें म्हणोनियां बहु
दु:खाचा वळसा |बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा | तृष्णा सांडूनियां योगी गेले
वनवासा ||६||
मदालसाने आपल्या मुलांना पाळण्यातच हा उपदेश
केला आणि विशेष म्हणजे तिचे पुत्र हा उपदेश ऐकून संन्यासी झाले . म्हणून
देहाचे नश्वरत्व कळावे आणि आता तर सध्या कोरणाची साथ सुरु आहे व जगातील सर्व
लोकांना कळून चुकले कि मानवी जीवन हे किती पराधीन आहे , पैसा,धन द्रव्य काहीही उपयोगाला येत नाही,नव्हे जर कोरोना झालाय एव्हडे जरी कळाले तरी
कोणीही जवळ येत नाही आणि कदाचित जर माणूस कोरणाने मेला तर त्याच्या प्रेताला
सुद्धा हातही लावीत नाही कुठलेही धार्मिक संस्कार सुद्धा होत नाहीत लगेच उचलतात
आणि स्मशानात नेवून चितेवर ढकलून देवून जाळून टाकतात.
“नको नको मना गुंतू माया
जाळी,| काळ हा आला जवळी ग्रासावया ll१||
काळाची हि उडी पडेल बा जेव्हा | सोडविना
तेव्हा माय बाप ll२||
सोडविना राजा देशीचा रे चौधरी |आणिक
सोयरी भली भली ll३||
तुका म्हणे तुला सोडविणा कुणी | एका
चक्रपाणी वाचुनी l४||l “
म्हणून
हे मानावा या मायेत तू अडकू नको व देह तादात्म्य सोडून
देवून जीवन्मुक्तीचा मार्ग धार म्हणजे तू सहज मुक्त होशील आणि अशा वेळी हे मानावा
तू प्रेमाने गोविंदाचे भजन कर. म्हणजे मग तुला खरे
समाधान मिळेल .
बालस्तावतक्रीडासक्त: तरुण्स्तावत्तरुणीस्क्त:|
वृध्दस्तावच्चिन्तासक्त: परमे ब्रह्मणी कोsपि न सक्त ||
भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुढमते....
॥ध्रु॥ ९||
मनुष्य जीवनाचे जन्मापासून काही महत्वाचे भाग पडतात बालपण, तरुणपण आणि वृद्धापकाळ या
तीनही स्तरातून मानव जेव्हा जातो तेव्हा त्याची संसार आसक्ती सुटत नाही. आयुष्य
किती आहे हे कोणीही सांगू शकत नाही पण आपण उद्या जिवंत आहोत असाच सर्वांना भ्रम
असतो. “ ब्रह्म भिन्नम सर्व मिथ्या ||” असे वेद सांगतो ब्रह्म खरे आहे बाकी सर्व
मिथ्या आहे. खरे आहे असे फक्त भासते पण प्रत्यक्ष अनुभव घेतला तर मात्र ते खोटे
ठरते. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात ,” रज्जू सर्पाकार | भासियाले जगडंबर ||” , संध्याकाळचे वेळी दोरीवर सर्प भ्रम होत असतो
कारण “ आधी दोरी होती खरी | सर्प कल्पना उमटे दुसरी | तैसे सत्य अधिष्ठानावारी | जगत कल्पना उमटे || ए. म. || दोरीचे दोरीरूपाने ज्ञान न
होता ते सर्परूपाने अन्यथा ज्ञान (विपरीत ज्ञान) होते. तसेच जगत खरे तर नाही पण ब्रह्मस्वरूप
अधिष्ठानावर जगात कल्पना भासत असते व ते सत्य रूपाने भासत असते. कल्पनेला सत्यत्व
दिले कि दु:ख होणारच. “कासया सत्य मनिला संसार | का हे केले चार माझे माझे” ||तु.म.|| जगद्गुरू श्री तुकाराम
महाराज म्हणतात हे जीवा तू संसार का सत्य मानला ? व माझे माझे का म्हणालास ?याला कारण फक्त अज्ञान आहे .
अरे तुझ्या जीवनात किती स्थित्यंतरे झाली हे तुला तरी कळले का ?
बालपण गेले नेणता | तरुणपणी विषयव्यथा | वृद्धपाणी प्रवर्तली चिंता | मरे मागुता जन्म धरी || संत सांगतात कि हे जीवा तुझे
बालपण अज्ञानातच गेले व तरुणपणी विषयासक्ती तुला जडली व तू त्यातच आसक्त झालास.
माउली म्हणतात “ विषयाचे समसुख बेगाडाची बाहुली | अभ्राची साउली जाईल रया ||” विषयाचे सुख हे भासमान असते
ते प्राप्त करताना दु:ख , प्राप्त जरी झाले तरी
रक्षणाचे दु:ख , व नष्ट झाले तर आणखी दु:ख.
भर्तुहरी म्हणतो
,” भोगा न भुक्ता वयमेव भुक्ताः
तपो न तप्तं वयमेव तप्ताः ।
कालो
न यातो वयमेव याताः ,तृष्णा न जीर्णा वयमेव
जीर्णाः ॥“
आम्ही भोग भोगीत नाही तर
भोगच आम्हाला भोगतो . आपल्याला वाटते कि आपण गुलाबजाम खातो पण तोच गुलाबजाम मात्र
आपल्याला भोगीत असतो तो आपली शुगर वाढवतो व मधुमेहाचा रोगी बनवतो. असेच
पंचविषयातील भोग आपण भोगीत नसून ते भोगच आपल्याला भोगीत असतात. तापच आपणास तप्त
करीत असतो.काळ आपल्याला खात असतो हे लक्षातच येत नाही . आपली तृष्णा जीर्ण होत
नाही आपण जीर्ण होतो.
आचार्य आपणास हे अंतिम सत्य सांगतात. कि तू
वृद्धापकाळापर्यंत आलास पण तुला तुझे खरे हित अजून कळले नाही विचारहीन माणसाच्या
जीवनात साधारण क्रीडा , भोगासक्ती,आणि दु:ख या तीन मर्यादा आहेत निसर्गात: कोणीही
मनुष्य , प्राणी कालप्रवाहाच्या विरुध्द जावू शकत नाही पण तो
त्यावेळी सावध मात्र होऊ शकतो. जीवनाच्या संध्याकाळी म्हणजेच म्हतारपणी तरी सावध
व्हावे ज्ञानेंद्रिये हि स्वभावात: बह्हीर्मुख आहेत म्हणूनच शम,दम साधून परब्रह्मस्वरूपाविषयी जाणून घेण्याचा
प्रयत्न करवा व इंद्रियांना अंतर्मुख करून जीवब्रह्मैक्य साधून घेऊन कृतार्थ
व्हावे यातच खरे हित आहे. ..
का ते कांता कस्ते पुत्र: ,संसारोsयमतीव विचित्र: |
कास्य त्वं क: कुत आयात: तत्वं
चिन्तय तदिह भ्रात||१०||
कोण तुझी पत्नी ? कोण तुझा मुलगा? तू कोणाचा आहेस? तू कोण आहेस? तू कोठून आलास ? हा संसार अतिशय विचित्र
आहे हे बंधो ! यामधील सत्याचा विचार कर तोही येथेच कर ...
मानव हा समूहप्रिय प्राणी आहे . यातूनच कुटुंब संस्था उदयाला आली
आहे. एका दृष्टीने ते चांगले आहे कारण मानव हा काही इतर पशुप्रमाणे नाही. त्याला
बुद्धी आहे , वाणी आहे चांगल्या वाईटाचा
निर्णय करता येतो. नीती नियमाचे पालनही करता येते. माता पिता बंधू बहिण यातील ममत्व, नीती संबंध हे सर्व त्याला कळतात व त्याप्रमाणे तो
आचरण करण्याचा प्रयत्न करीत असतो.
या नात्यागोत्यामध्ये खरे हित कोणी सांगणारा आहे का ? कि फक्त आसक्ती असते ? हेही समजले पाहिजे. हे सर्व नाते निसंशय
पवित्र असतात यात शंका नाही. पण आपल्याला मनुष्य जन्म कशाकरीता मिळाला हे समजले पाहिजे .
“नरादेहाचेनी ज्ञाने | सद्चिदानंद पदवी घेणे | एवढा अधिकार नारायणे | कृपावालोकाने दिधला || ना.म. || “ मानवी देह मोक्षाकारीता
मिळाला आहे पण संसारात , नात्यागोत्यात आसक्त होऊन मनुष्यजन्माचे खरे
कर्तव्यच विसरून गेला. त्यास वैराग्य व्हावे म्हणून भगवदपुज्यापद आद्य श्री शंकराचार्य स्वामी त्या जीवाला सांगतात कि
अरे ! तू ज्या संसारात माझे माझे
म्हणून रामातोस तो संसार तुझा आहे का ? त्यामधील तुझी बायको शेवटपर्यंत तुझी साथ
देणार आहे का ? विवाह संबंधाने तुम्ही
एकत्र आला आहात लग्नापूर्वी तुम्ही एकत्र होता काय ? तर नाही .. आणि दोघांपैकी कोणीतरी अगोदर हे
जग सोडून जाणार आहे त्यानंतर तुमचा संबंध असणार आहे का ? तर नाही . थोडक्यात संसार
म्हणजे मानवाचे परीक्षास्थळ आहे . संयमाने आणि अनासक्तीने प्रपंच सुद्धा मुक्तीला
कारण होऊ शकतो पण तो अलिप्तपणे करता आला पाहिजे . जगद्गुरू श्री तुकाराम महाराज
म्हणतात
,” जाणोनी नेणते करी माझे
मन।तुझी प्रेमखूण देवोनिया॥ १॥मग मी व्यवहारी असेन वर्तत।जेवी जळा आत
पद्मपत्र॥२॥ऐकोनी नाईके निंदास्तुती कानी।जैसा का उन्मनी योगीराज॥३॥
देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी।स्वप्नीचिया सृष्टी चेइल्या
जेवी॥४॥
तुका म्हणे ऐसे झालीयावाचून। करणे तो शिण वाटतसे || “
वरील
अभंगात सांगितल्याप्रमाणे जर अनासक्त बुद्धीने संसारात राहिले तर मनुष्याचा उद्धार
झाल्यावाचून राहत नाही हे श्रीतुकाराम महाराजांनी उदाहरणासह पटवून दिले आहे आणि
श्री शंकराचार्यांना देखील हेच म्हणावयाचे आहे. म्हणून ते सांगतात कि बायको तुझा उद्धार
करणार नाही. अपवाद वगळता (चुडाला राणी). पुत्राची व्याख्या करतांना शास्त्र म्हणते
"पु "नामक नरकातून जो तारतो तू खरा पुत्र असतो. जो आई वडिलांची सेवा कतो
तो खरा पुत्र. पण हे सगळेच असे नसतात. उलट म्हातारपणी आई वडिलांना सोडून जाणारे
पुष्कळ , त्यांना वृद्धाश्रामात
ठेवणारे जास्त दिसतात. “ नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी | अंती जाशील एकाला रे
प्राण्या माझे माझे म्हणोनी ||” अंतकाळी कोणीच वाचवायला येत नाही. उलट सगळे
सोडून जातात प्रसिद्ध उदाहरण गजेंद्राचे आहे." शेजीची कमिन दुरी राहे"| हे तुकाराम महाराज
सांगतात.
मानवाने स्वत:ला जाणले पाहिजे हाच खरा परमार्थ आहे.
अध्यात्म वेगळे आणि धर्म वेगळा आहे धर्म नीती नियम , विहित निषिद्ध काय आहे याची शिकवण देतो पण
अध्यात्म मात्र “ तू कोण आहेस हे शिकवितो “. आत्म्याचे यथार्थ रूप अध्यात्म
शिकविते. तू कोठून आलास , तुला कोठे जायचे आहे हे
अध्यात्म शिकविते. म्हणून हे बंधो ! तू सार असार याचा विचार कर ,खरे काय खोटे काय याचा
विचार कर तोही या इहलोकीच आणि येथेच व आत्ता कर तरच काही तरणोपाय होईल अन्यथा अवघड
आहे. “ know
thyself “ असे
स्वामी विवेकानंद म्हणतात. स्वतःला जाणं हेच खरे अध्यात्म.
सतसंगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहत्वम |
निर्मोहत्वे निश्चलत्वम निश्चलत्वे जीवन्मुक्ति :
||११||
संगती हि खूप महत्वाची असते , तुम्ही कोणाच्या संगतीत राहता यावरून तुमचे
चारित्र्य ,
व्यक्तिमत्व ठरत
असते. संगती,
विसगंती कुसंगती
आणि संतसंगती असे साधारणपणे संगतीचे प्रकार पडतात. सर्वसामान्यपणे ज्या समाजात
किंवा लोकामध्ये राहावे लागते त्या संगतीला सामान्यत: संगती म्हणतात. त्या संगतीचा
सुद्धा माणसाच्या चारित्र्यावर परिणाम होत असतो. याच संगतीमध्ये कधी कधी आपल्याला
न आवडणार्या लोकांची संगती घडत असते. आपले विचार वेगळे असतात व अगदी त्याच्या
विरुध्द विचार समोरच्या व्यक्तीचे असतात. याला विसंगती म्हणतात. उदा. प्रल्हाद हा
पारमार्थिक होता तर त्याचा पिता मात्र पारमार्थिक नव्हता हि विसंगती होती. अशा
वेळेला हि विसंगती टाळता आली तर चांगलेच पण ! प्रल्हाद जसा पित्याची संगती टाळू
शकत नव्हता आणि स्वत:चा स्वभाव सुद्धा बदलू शकत नव्हता. अशा वेळेला विसंगतीची
उपेक्षा करावी हेच श्रेयस्कर.
कुसंगती हा प्रकार फार विचित्र आहे . या
संगतीमध्ये निशिचीतपणे
अध:पतन ठरलेले
असते. म्हणूनच श्री नारद महर्षी म्हतात ,” कुसंग सर्वथा त्याज्य |”
कुसंग कधीही
करूच नये तो संग
टाळलाच पाहिजे.
कुसंगतीने आपल्याला आघात झाल्याशिवाय राहत नाही. एक दृष्टांत आहे एक राजहंस होता
जो फक्त मोत्याचा चारा खात असे व मानसरोवरात राहत असे.पण चुकून त्याची मैत्री एका
कावळ्याबरोबर
झाली. कावळा
म्हटले कि सर्व दृष्टीने वाईटच. त्याचे राहणे खाणे सर्वच विचित्र तो काय खाईल हे
सांगता येणार नाही पण या दोघांची मैत्री झाली हे खरे. एकदा काय झाले दोघेही
आकाशमार्गाने उडत चालले होते व एका जंगलात उंच मोठ्या झाडावर येऊन बसले. नेमके
त्याच वेळी त्या देशाचा राजा शिकार करीत तेथे आला तो खूप थकला होता म्हणून त्याच
झाडाखाली येऊन झोपला. थोड्या वेळाने सूर्य वर आला आणि त्याचे किरणे राजाच्या डोक्यावर
पडू लागले. राजहंसाला वाटले आपल्या देशाचा राजा आहे, थकलेला आहे ,या उन्हामुळे त्याची झोप मोडेल म्हणून त्या
हंसाने आपले दोन्ही पंख पसरवून ते किरणे आपल्या पंखावर घेऊन राजाच्या डोक्यावर
सावली धरली. तेवढ्यात तो कावळा त्याच फांदीवर येऊन बसला आणि राजच्या डोक्यावर
विष्ठा टाकली व उडून गेला राजाची झोप मोडली व त्याने वर बघितले तर त्याला नेमका राजहंस दिसला ,राजाला राग आला आणि त्याने त्या हंसाला बाण
मारला व तो राजहंस मारला गेला. तात्पर्य कुसंगती काही कामाची नाही ती कुसंगती
टाळलीच पाहिजे. व्यसनी माणसाची संगती म्हणजे कुसंगती अशी संगती कामाची नाही .
जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात "#ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला | #कुसंगे नाडला साधू तैसा|| " ढेकणाची संगती जर
झाली तर कणखर
असा हिरा सुद्धा भंग पावतो तसे कु संगतीने साधूचे सुद्धा पतन होऊ शकते म्हणून
कुसंगती निश्चितपणे त्यागली पाहिजे.
केकावलीमध्ये मोरोपंत म्हणतात “सुसंगती सदा
घडो सुजन वाक्य कानी पडो,
कलंक मतीचा झडो
विषय सर्वथा नावडो ||
सदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडो, वियोग घडता रडो ,मन भगवतचरित्री जडो || “
सुसंगती म्हणजेच संतसंगती सर्वात महत्वाची व
श्रेयस्कर . आचार्य या श्लोकात हेच सांगतात कि संत संग महत्वाचा आहे या संगतीनेच
निसंगत्व प्राप्त होते. आपल्या सर्व संतानी सुद्धा भगवंताजवळ हेच मागितले आहे .
जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात, “ न लगे धन संपदा |संत संग देई सदा||” माउली ज्ञानोबाराय हरिपाठात म्हणतात ,”संताचे संगती मनोमार्ग गती | आकळावा श्रीपती येणे पंथे ||” संत एकनाथ महाराज म्हणतात “ हरीप्रप्तीसी
उपाय |
धरावे संतांचे
ते पाय ||”
तात्पर्य सर्व
संताचे म्हणणे सारखेच आहे कारण संत हे निष्काम, निरपेक्ष,
व लाभाविण
प्रीती करणारे असतात. त्यांच्या अंत:करणात कसलीही अपेक्षा, मोह नसतो म्हणून अशा संतांचे संगतीत आपण गेलो
तर आपल्यालाहि निर्मोहत्व,
निसंगत्व
प्राप्त होते. कोणताही संग चांगला असतोच असे नाही. फक्त संतसंगच हितकारक असतो.
त्यांच्या संगतीत आपणही निसंग होतो. सर्व दुख: हे संगाने होत असते. संगाने
तादात्म्य जडत असते व तादात्म्य जडले कि दुख: होतेच. माझे माझे म्हंटले कि दुख:
अपोआप येते,व निसंगत्व असले म्हणजे दुखाचा संबंध येत
नाही. निसंगत्वाने
कोणाचाही मोह
राहत नाही आणि मोह नसला म्हणजे खेद राहत नाही. अर्जुनाला मोह झाला म्हणूनच त्याला
श्रीकृष्णाने श्रीमदभागवतगीता सांगितली व मोह नष्ट केला स्वत: अर्जुनच म्हणला
“नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत। स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये
वचनं तव।।१८-७३ ।।
तात्पर्य मोह
नष्ट झाला म्हणजे दुख: राहत नाही.
ज्याला मोह नाही
तो निश्चल बुद्धीचा असतो त्याच्या बुद्धीमध्ये चंचलत्व राहत नाही. अंत:कारण चंचल
झाले कि विक्षेप सुरु होतो व विक्षेप आला कि अन्यथाज्ञान येते म्हणजेच विपरीत
ज्ञान येते व त्यामुळेच दुख: पदरात पडते. गीतेमधे साहव्या अध्यायात भगवान म्हणतात ,” चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम्।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्।।६-३४ ।।“ स्थिरअंत:करणात आनंद प्राप्त
होतो. निश्चल मन हे नेहमी आनंदि असते. ज्याचे मन निश्चल झाले आहे तोच जीवन्मुक्त
असतो असे आचार्यांना म्हणायचे आहे. ज्याला देहाचे बाधित भान असते तो जीवन्मुक्त
असतो व असाच महात्मा जगाला तारीत असतो. समाजाच्या उपयोगी हाच महात्मा येत असतो.
म्हणून आचार्यांनी या श्लोकात फार सुंदर क्रम संगीताला तों म्हणजे सत्संगाने
निसंगात्व ,
निसंगत्वाने
निर्मोहत्व ,
निर्मोहात्वाने
निश्चलत्व
व निश्चलत्वाने
जीवन्मुक्ति.
वरील पद्धतीने मानवी जीवन झाले तर ते एक
साधुचे
जीवन व आनंदी
जीवन ठरते.
वयसि गते
क: काम विकार:,शुष्के नीरे क: कासार: |
क्षीणे वीत्ते: क: परिवार:, ज्ञाते तत्वे क: संसार: ||१२ }}
तारुण्य ओसरल्यावर कुठल्या आल्या आहेत लैंगिक तृष्णेच्या
चेष्टा ? जल आटल्यावर सरोवराचे
अस्तित्व असते का ? जवळचा पैसा संपल्यावर
परिवार कुठे असतो ? संसाराचे सत्य स्वरूप
समजले , यथार्थ ब्र्हम्ज्ञान झाले
तर संसाराचे अस्तित्व राहते का ? हा संपूर्ण श्लोकाचा सरळ अर्थ आहे .
मानवाची वाढ हि गर्भधरणेपासूनच होत असते. बाल्यावस्था , कुमार,किशोर,तरुण,प्रौढ आणि वृद्धावस्था या
टप्प्यापैकी दहाव्या वर्षपासून सोळा ते विस वर्षापर्यंतचा काळ हा संक्रमणाचा काळ
समजाला जातो या संक्रमणाच्या काळाला किशोरवय म्हणतात. या कालखंडात अपरिपक्व
मुलांची पूर्ण शारीरिक वाढ झालेल्या व मानसिक दृष्ट्या प्रगल्भ तारुण्यात रुपांतर
होते व याच वयात माणसाची लैंगिक वाढ होते व या विकासाच्या टप्प्याला पौगंडावस्था
म्हणतात. प्रजनन शक्ती हि मानवी समाज वाढीसाठी मिळालेली फार मोठी ईश्वरी देणगी
आहे. धर्माला अविरुध्द असणारा काम म्हणजे माझी विभूती आहे असे श्रीकृष्णाने गीतेत
म्हटले आहे. पण हाच काम जेव्हा वासनेत परिवर्तीत होतो तेव्हा तो मानवी जीवन विकृत
करून टाकतो.
हाच काम विकार किती काळ शरीरात कार्यरत राहू शकतो ? याला पण मर्यादा आहेत. हा
काम विकार फक्त शरीर सुदृढ व सशक्त आहे तोपर्यंतच कार्यरत असतो. पौगड तारुण्य
अवस्था आहे तोपर्यंतच पुढे प्रौढावस्था व वृद्धावस्था आली कि इंद्रिये शिथिल आणि
कार्यक्षमरहित होऊ लागतात. पंचज्ञानेन्दिये व पंचकर्मेंद्रिये सर्व शिथिल होऊ
लागतात. घरातील लहान मुले सुद्धा म्हणतात ,” इंद्रिये मावळली म्हणती आला बागुल आजा ||”
मनामध्ये वासना असते पण शारीरिक बल संपल्यामुळे इंद्रियात
शक्ती नसते त्यामुळे तो भोग देखील भोगू शकत नाही. वैराग्यशतकामध्ये म्हटलेले आहे
“भोगा न भुक्ता वयमेव
भुक्ताः, तपो न तप्तं वयमेव तप्ताः
।
कालो न यातो वयमेव याताः, तृष्णा न जीर्णा वयमेव
जीर्णाः ॥
आम्ही भोग नाही भोगले , भोगानेच आम्हाला भोगले , आम्ही तप नाही केले तर
आम्ही तापलो, आम्ही काळ व्यतीत नाही
केला तर काळानेच आम्हाला मागे सरले आहे आणि तरीही तृष्णा जीर्ण झाली नाही आम्ही
जीर्ण झालो. आता भोग जरी समोर असला तरी आम्ही तो भोग भोगू शकत नाही कारण आचार्य
म्हणतात “वयसि गते क: काम विकार:, आता कामवासना असली तरी तिचा उपयोग नाही कारण
वय सरले याकरिता आचार्य दृष्टांत देतात “शुष्के नीरे क: कासार: “ सरोवरातील पाणी
आटले तर त्याला सरोवर कोणी म्हणत नाही. माउली सुद्धा म्हणतात कि “ सरोवर आटल्यावर
त्यामध्ये प्रतिबिंब पडू शकत नाही. “ तोच प्रकार येथे आहे .
आचार्य पुढे आणखी सांगतात “क्षीणे वीत्ते: क: परिवार”
जोपर्यंत माणसाजवळ पैसा ,धन, द्रव्य आहे तोपर्यंतच
घरातील सर्व नातेवाईक आप्तेष्ट ख्याली खुशाली विचारतात नंतर कोणीही विचारीत नाही .
जोवरी बरवा चाले धंदा तोवरी बहिण म्हणे दादा|| (https://www.lokmat.com/adhyatmik/artical-adhyatmic/ या लिंकवर आपण सवे नये रे
लंगोटी हा माझा लेख जरूर वाचा)
जोर्यंत धन द्रव्य असते तोपर्यंतच हे सर्व विचारतात पैसा
संपला परिवार संपतो उदाहरणच द्यायचे झाले तर भागवतातील अकराव्या स्कधातील कदर्यूचे
आख्यान सांगता येईल.
वेदांताचे तीन सिद्धान आहेत १- ब्रह्म सत्य आहे २-जग मिथ्या
आहे. ३- जीव ब्र्हम्ररूप आहे . ब्रहामचे सत्यत्व व जगताचे मिथ्यत्व व जीव हा
ब्रह्माचा अंश आहे म्हणून तो ब्रहमरूप आहे असे कळले कि संसाराचे अस्तित्वच संपते
“ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः
कस्यस्विद्धनम् ।।
#ईशोपनिषद्, मन्त्र १ ) हे सर्व जग सत्य नसून
ईश्वरच आहे या सृष्टीतील पदार्थाचा मर्यदित भोग घे याचा संग्रह करू नकोस हे धन
कोणाचे आहे ? श्री नामदेव महाराज
म्हणतात ,” धन दारा पुत्र जन । बंधू
सोयरे पिशून । सर्व मिथ्या हें जाणून । शरण रिघा देवासी ॥ २ ॥“ जन्म आणि मरण हा
एकप्रकारच संसारच आहे व तो कल्पित आहे हे कळले कि मग संसार राहतोच कुठे ?
“ ब्रह्मविद ब्रह्मैव भवती |” ब्रहमला जाणणारा ब्रह्मच
होतो त्यासठी या अगोदरच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे आचरण करावे लागेल हे मात्र
खरे .
मा कुरु धनजनयौवनगर्वं, हरति निमेषात्काल सर्वं ||
मायामयमिदमखिलम बुद्ध्वा ब्रह्मपदंदंत्व प्रविश विदित्वा ||१३||
धन संपत्ती, जनसंपर्क , तारुण्य याचा गर्व करू नको. काळ निमिषार्धात सर्व हरण
करू शकतो .हे सर्व मायामय म्हणजेच मिथ्या आहे असे समजून घे व ब्रह्मस्वरुपात
प्रवेश कर . हा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे.
धन द्रव्य संपत्ती मालमत्ता टिकणारे नाही धनाच्या मागे १५
अनर्थ आहेत. अर्थस्य पुरुषो दास:, दास तू अर्थो न कस्यचित | इति मत्वा महाराज ,बुद्ध अस्मि अर्धेन कौरवै: ||महाभारत || आचार्य भीष्म युधीष्ठीराला
म्हणतात राजन अर्थ कोणाचाही दास नाही सर्व अर्थाचे (पैशाचे) दास आहेत. आता हेच पहा
ना कौरवांना या धनाच्या गर्वानेच अहंकारी बनवले आहे व माझी सुद्धा बुद्धी मलीन
झाली याला कारण अर्थच आहे . “ धन दारा पुत्र जन | बंधू सोयरे पिशुन | सर्व मिथ्या हे जाणून | शरण रिघा देवासी ||” संत नामदेव महाराजही
सांगतात कि हे धन , पत्नी, पुत्र व जन म्हणजे बंधू
नातेवाईक कोणीही कामाला येत नाही प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. म्हणून
सर्वांचे ममत्व सोडणे हितकारक आहे. लोक वासना काही कामाची नाही. आपले तारुण्य सुद्धा
चिरकला टिकणारे नाही कधी वृद्धापकाळ येईल सांगता येत नाही. म्हणून या सर्व
गोस्ठीचा गर्व करू नको. काळाने ग्रासिले सावधान व्हारे | सोडवण करारे हरिनामे ||१||आयुष्य सरलिया कोण पा सांगाती |पुढे हो फजिती यमदंड ||२||उपाय तो सोपा नामाचा गजर |न करी विचार पुढे काही ||३||एका जनार्दनी तू का रे आंधळा | देखातोसी सुख दु:ख ||४|| शांतीब्रह्म संत श्री
एकनाथ महारज जगातील अंतिम सत्य सांगतात कि हे जीवा काळाने सर्वांना ग्रासिले आहे
कोणीही या काळाच्या तावडीतून सुटू शकत नाही. म्हणून तुम्ही हरीनाम घ्या आणि सोडवण
करा. आयुष्य संपल्यावर कोनही वाचवू शकत नाही . आता तुम्हीच बघा ना “कोरोनो
व्हायरस” भयानक आजार जगभर पसरला आहे तर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बरे करोनाजवळ
कोणताही भेद नाही तो गरीब श्रीमंत काही पहात नाही, काळ श्रेष्ठ आहे मृत्युच्या भीतीने लोक
घराबाहेर निघायला सुद्धा घाबरतात. म्हणून नाथ बाबा सांगतात कि तुम्ही सावधान व्हा
हरीनाम घ्या व सोडवण करा. आयुष्य जर संपले तर कोणीहि वाचवू शकत नाही. हरीनाम हा
सोपा उपाय आहे. त्यामुळे काहीही विचार न करता नामस्मरण करा मग प्रारब्धात असेल तसे
होईल. नाथबाबा म्हणतात तुला हे सर्व समजत असून तू का आंधळा होतोस ?आणि सुख दु:ख बघातोस ..
श्रीमद
आचार्य स्वामी आद्य शंकराचार्य महाराज म्हणतात धन द्र्व्यादिक सर्व
मिथ्या आहे नष्ट होणारे आहे. याला आश्रय नाश , परत: नाश, स्वत: नाश असे तीन प्रकारचे नाश आहेत. हे
फक्त व्यावहारिक सत्तेतच भासणारे आहेत. म्हणून याचा विस्वास धरू नये. जीवाने
प्रयत्नपूर्वक ब्रह्मस्तिथी प्राप्त करून घ्यावी व तोच अनुभव घेऊन त्या
ब्रह्मस्थितीत प्रवेश कर. मनुष्य जीवनाचे अंतिम गन्तव्य स्थान हेच आहे.
दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायातः।
कालः क्रीडति गच्छत्यायुः तदपि न मुञ्चति आशावायु||१४ ||
ज्योतिषशास्त्रानुसार कलीयुगामध्ये ७ महान
व्यक्तींनी संवत सुरु केले आहेत. युधिष्ठर, विक्रम, शालिवाहन, विजयाभिनन्दन, नागार्जुन, कल्की छत्रपती
श्री शिवाजी महाराज हे ते सात व्यक्ती आहेत. या आगोदर सप्त ऋषींनी संवत सुरु
केले होते व त्यानुसारच नंतरच्या लोकांनी अपडेट केले आहेत. कालगणनेमध्ये क्रमश:
प्रहर, दिवस, रात्र, पक्ष,आयन, संवत्सर, दिव्य
वर्ष,मन्वंतर ,युग,कल्प,आणि
ब्रह्माची कालगणना यानंतर केली जाते. या चक्रीय पद्धतीने हिंदूंनी आपली कालगणना
विभाजित केली आहे. जसे कि कल्प,मन्वंतर,युग,(सत्ययुग(कृत),त्रेता, द्वापार ,कलियुग
)हि कालगणना चक्रीय पद्धतीने पुन्हा:पुन्हा: येत असते. चक्रीय याचा अर्थ, सूर्योदय
व सूर्यास्त व पुन्हा: सूर्योदय होणे एवढाच नाही तर काल हा चक्रीय नसून घटनाक्रम
चक्रीय आहे याची पुनरवृत्ती होते.व पुनरावृत्तीमध्ये पण घटनाक्रम पहिल्यासारखा
नसतो.
याच चक्रीय कालमानाप्रमाणे ब्रह्माचे
आयुर्मानाच्या दुसर्या खंडामध्ये श्वेत वाराह खंडामध्ये वैवस्वत मन्वंतर व
अठ्ठावीसावे कलियुग सुरु आहे. या कलियुगाच्या संपतीनंतर पुन्हा: सत्ययुग सुरु होणार .
हिंदूंच्या
कालगणनेनुसार पृथ्वीवर सजीवांची सुरुवात अंदाजे २०० कोटी वर्ष्यापुर्वी सुरु
झाली असावी. ऋतूचक्र अनादी काळापासून सुरूच आहे. त्याला नावे फक्त नंतर दिली गेली.
ऋतूचक्र
याप्रमाणे आहे , वसन्त (Spring)चैत्र ते वैशाख (वैदिक मधु आणि माधव)मार्च ते एप्रिल , ग्रीष्म (Summer)ज्येष्ठ ते आषाढ (वैदिक शुक्र आणि शुचि) मे ते जून, वर्षा (Rainy)श्रावन ते भाद्रपद (वैदिक नभः आणि नभस्य)जुलै ते संप्टेंबर , शरद् (Autumn)आश्विन ते कार्तिक (वैदिक इष आणि उर्ज) ऑक्टोंबर ते नोवेंबर , हेमन्त (pre-winter)मार्गशीर्ष ते पौष (वैदिक सहः- सहस्य) डिसेंबर ते १५ जानेवारी , शिशिर (Winter) माघ ते फाल्गुन (वैदिक तपः आणि तपस्य) 16 जनवरी ते फेब्रुवारी.
वरीलप्रमाणे साधारणपणे हिंदू धर्माची कालगणना
केली जाते श्री शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात कि दिवस रात्र येतात जातात.
शिशिर ,
वसंत
आदि ऋतू येतात व जातात पण जीवाची अशा काही सुटत नाही.
जनक राजाच्या राज्यामध्ये एक “पिंगला “
नावाची वेश्या होती एक दिवस ती तिच्याकडे येणाऱ्या धनिक पुरुषांची रात्रभर वाट बघत
राहिली पण त्या रात्री तिच्याकडे कोणीही ढुंकून देखील बघितले नाही. तिला खूप
पश्चाताप झाला आणि नेमके त्याच वेळी श्री अवधूत म्हणजे श्री दत्तात्रयांचे दर्शन
झाले आणि तिच्या लक्षात आले कि भोगामध्ये सुख नाही तर त्यागातच सुख आहे.
आशा हि परमं दुःखं
नैराश्यं परमं सुखम् । यथा संछिद्य कान्ताशां सुखं सुष्वाप पिंगला ॥ (श्रीमद्भागवत
११/८/४४) मित्रांनो विचार करा एका
वेश्येने अंतर्मुख होऊन विचार केला तर तिचा सुद्धा उद्धार झाला. लोक म्हणतात कि
माणसाचे जीवन आशेवर आहे पण ते संतांच्या दृष्टीने चुकीचे आहे तर संत म्हणतात
सर्व सुखाचिया आशा जन्म गेला । क्षण एक
मुक्ति यत्न नाहीं केला l हिंडतां दिशा शीण पावला ।
माया वेष्टिला जीव माझा ॥१॥माझें स्वहित नेणती कोणी । कांहींच न करिती मजवांचूनि ।
सज्जन तंव सुखाची मांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥धृ॥तु. म. ||
सुखाच्या आशेत जन्म गेला कि सुखात गेला? हे काहीच कळत नाही. खरे तर सुखाच्या आशेत जन्म गेला पण सुख नाही मिळाले.
संत मुक्ताबाई सुद्धा ताटीच्या अभंगात म्हणतात “आशा दंभ अवघे
आवरा | ताटी उधदा ज्ञानेश्वरा || श्री
संत नाथ बाबा म्हणतात “आशा उपजली भगवंतासी।नीच वामनत्व आले
त्यासी।आशेने दीन केले सर्वासी।“आशा सर्वासी घातक॥“ भगवंताला
बालीराजाकडून त्रिपाद भूमी दान मागण्याची आशा निर्माण झाली तर त्याकरिता त्याला
लहान व्हावे लागले या आशेने सर्वांना दिन केले आहे. भगवान आद्य श्रीशंकराचार्य
स्वामी महाराज हेच सांगतत कि आयुष्य क्षणाक्षणाने
निघून जात आहे. तरीही या मानवाला आशेतून सुटका होत नाही. आशा व्याली दु:खाते |
आशेने दु:खाला जन्म दिला म्हणून वैराग्यच सुखाला कारण आहे हेच
सत्य आहे.
का ते कान्ता धनगतचिन्ता वातुल
किं तव नास्ति नियन्ता।
त्रिजगति सज्जन संगतिरेका भवति
भवार्णवतरणे नौका ॥१५॥
प्रपंचातील
पती ,पत्नी कोण कोणाचे आहे ? तु व्यर्थ
धनाची चिंता का करतोस? या संसाराची चिंता करून काहीच उपयोग
नाही. सतत जीव या चिंतेच्या फेर्यात अडकून राहतो ? आम्ही
संतांनी दाखवलेल्या मार्गानुसार का चालत नसू बरे ?या संतांनी
दाखवलेल्या मार्गाने जर गेलो तरच आपण या मोहाच्या व संसाराच्या चिंतेतून मुक्त
होऊ.
संसार म्हणजे जन्म आणि मृत्यू व या दोन्हीच्या
मध्ये असतो तो म्हणजे प्रपंच तो जसा गृहस्थाचा असतो तसा तो संन्याशाचा सुद्धा
असतो. गृहस्थ म्हटले कि त्याला पत्नी, मुले बाळे, आई , वडील सर्व नाते गोते येतातच.
व या सर्वांचा सहवास फार सुखाचा असतो असे नाही. पण! यातच जीवाला सुख वाटत असते.
श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक पती आपल्या पत्नीच्या एवढा अधीन होतो कि सर्व
सुख तिच्याच सहवासात आहे असे मानतो “ चित्त आराधी स्त्रियेचे |तीयेचेनी छंदे नाचे | माकड जैसे गारूड्याचे | तैशा परी होय || त्याची अवस्था एखाद्या माकडासारखी होते.
राजा भर्तुहरीसारखी
अवस्था वाईट होते त्याने एका साधूला मुल व्हावे म्हणून विनंती केली होती
तेव्हा त्या साधूने दिलेले फळ पत्नीला दिले पण तिचे प्रेम प्रधानावर होते
तिने त्याला दिले व त्या प्रधाचे प्रेम एका वेश्येवर होते त्याने वेश्येला
दिले तिला राजाविषयी आदर होता तिने भर्तुहरीला तेच फळ दिले यावरून राजाला
सर्व कळले आणि त्यांने सर्वसंगपरित्याग केला. भर्तृहरी शतक या अनुभावावरुनच त्याने
लिहिले आहे. तात्पर्य कोणीच कोणाचे नसते भरवसा धरू नये.
दुज्यावर प्रीती मोठी आपल्याचसाठी “ असे एक संतवाचन आहे. याचा अर्थ आपण जे दुसर्यावर प्रेम करतो ते त्याच्यासाठी
नसून आपल्यासाठीच असते.
बृहदारण्यक उपनिशषदामध्ये याज्ञवालक्य ऋषींनी त्यांची पत्नी मैत्रेयीस उपदेश केला
होता त्यात ते म्हणतात” न वा अरे, सर्वस्य कामाय सर्व प्रियं भवति, आत्मनस्तु वै कामाय सर्व प्रियं भवति। ... आत्मनः खलु
दर्शनन इदं सर्वं विदितं भवति। हे
मैत्रेयी कोणीही दुसर्यासाठी प्रेम करीत नाही स्वत:करीतच सर्व प्रिय असतात. पती
पत्नीवर प्रेम करतो, मुलाबाळावर
प्रेम करतो असे फक्त भासत असते वास्तविक जो तो स्वत:वरच प्रेम करीत असतो. आपला जीव
जर जायला लागला तर मनुष्य दुसर्याचा जीव घेतो. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज
म्हणतात ये सातें आलिया वोळंगा सारंगधरु । नाहीं तरि संसारु वायां
जाईल रया ॥१॥कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत । मृगजळवत जाईल रया ॥२॥विषयाचें सम सुख
बेगडाची बाहुली । आभ्राची सावुली
वायां जाईल रया ॥३॥ज्ञानदेव म्हणे पाहातां पाहलें । स्वप्नींचे चेईलें जायील रया ॥४॥ किंवा
क्षणभंगुर नाही भरवसा | व्हारे सावध तोडा माया आशा | काही न चले मग गळा पडेल फासा | पुढे हुशार थोर आहे वोळसा
गा ||तु. म.|| जीवन क्षणभंगुर आहे याचा भरवसा धरता येत नाही म्हणून सावध होऊन सद्सदविचार केला
पाहिजे व संतांनी दाखवलेल्या मार्गाने गेले पाहिजे श्री संत निळोबाराय म्हतात “
मार्ग दावोनी गेले आधी | दयानिधी संत ते ||” किंवा ज्ञानेश्वरीत संगीतले आहे “गुरु दाविलिया वाटा | येवोनिया विवेक तीर्थ तटा |धुवोनिया मळकटा | बुद्धीचा तेणे || म्हणूनच संतसंगती अत्यंत महत्वाची
आहे किंबहुना भावासारातून या संतसंगतीरुपी नोकेतून सहज पार जाता येईल. जगद्गुरू
श्री तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात “न लगे मुक्ती आणि संपदा | संत संग देई सदा ||.
अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशन विहीनं जातं
तुण्डम्।
वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चति आशापिण्डम् ॥१६ ॥
भारतीय संस्कृतीमध्ये चार
आश्रम सांगितले आहेत. खरे तर ते आयुष्याचे एक सुंदर नियोजन आहे पण माणूस
त्याप्रमाणे वागत नसतो आणि शेवटी दु:ख पदरात पडल्यावाचून राहत नाही. ब्रह्मचर्य , गृहस्थ ,वानप्रस्थ आणि शेवटी सन्यास हे चार आश्रम म्हणजेच मानवी जीनाचे सुंदर असे
नियोजन(management) आहे.
जीवन जाण्याची हि एक सुंदर असी शैली आहे. म्हातारपण हि न टळणारी बाब आहे. त्याचे
जर नियोजन तरुणपणात केले तर वृद्धापकाळ सुकर होतो अन्यथा भयानक असे दु:ख वाट्याला
आल्याशिवाय राहत नाही . ब्रह्मचर्य आश्रमात शिक्षण व करियर घडवणे हे महत्वाचे. जगद्गुरू
श्री तुकारम महाराजांनी त्याच्या एका अभंगत सांगितले आहे ब्रम्हचारी धर्म
घोकावें अक्षर । आश्रमीं विचार षटकर्में ॥१॥वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग । संन्यास
तो त्याग संकल्पाचा ॥ध्रु.॥परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथें याती धर्म कुळ नाहीं
॥२॥बोले वर्म जो चाले याविरहित । तो जाणा पतित श्रुति बोले ॥३॥ तुका म्हणे कांहीं
नाहीं नेमाविण । मोकळा तो सीण दुःख पावे ॥४॥
ब्रह्मचर्य आश्रम पूर्ण झाला
कि मग ग्रहस्थ आश्रमात प्रवेश होतो ग्रहस्थ आश्रमात सुद्धा संयमाने राहून
प्रजासातत्य राखावे लागते आणि याच वेळी वानप्रस्थ आश्रमाची तयारी करावी लागते पण
माणसे येथेच निष्काळजीपणा करतात भविष्याचा विचार व तजवीज केली तर म्हातारपण सुखाचे
जावू शकते. अन्यथा दु:ख टळत नाही.
या चार आश्रमाच्या व्यतिरिक्त एक पाचवा आश्रम या कलियुगात निर्माण
झाला आहे तो म्हणजे “वृद्धाश्रम”, म्हातारपण आले कि मग जे
हाल सुरु होतात त्याचा विचार न केलेला बरा. मुले बरे बघत नाहीत किंबहुना ते
उपेक्षा करतात कधीकधी अपमानास्पद बोलतात. जर काही इस्टेट , पेन्शन, असेल तर
तेवढ्यापुरते गोड बोलतात. कधीकधी तर त्यांच्या विरोधात कोर्टात सुद्धा
जातात.मुलांनी सर्व शेअर ताब्यात घेतले म्हणून रेमंड कंपनीच्या दाम्पत्यांना रो
हाउसमध्ये राहावे लागले.प्रसिध्द नट “बालगंधर्व “ हे म्हातारपणी पुण्यात फुटपातवर
अर्धांगवायू झाल्यामुळे असाहाय अवस्थेत पडलेले आढळले म्हणून “आपली आपण करा
सोडवण ||” हे ज्ञानेश्वर महाराजांचे वचन सार्थ आहे. एक तर
शरीर साथ देत नाही नाना प्रकारचे रोग शरीरात आलेले असतात. “चालिले
सोबती । काय मानिली निश्चिंती । काय करीसी एकला । काळ सन्निध पातला ॥ काही सावध तो
बरवा । करी आपुला काढावा ॥ चालिले अगळे । हळूच कान केश डोळे ॥ वोसरले दात । दाढा
गडबडल्या आत ॥ एकली तळमळ । जिव्हा भलते ढायी लोळे ॥ तुका म्हणे यांनी । तुझी
मांडली घालणी ॥"
"केसांचा वाक, मानेला बाक, पाठीचा
विळा, हाडांचा खिळा, म्हातारपण
हे नको मजला, नाही सुख नुसत्याच कळा" मिरजेतल्या अशोक
माळींच्या कवितेतल्या या ओळी यथार्थ वर्णन करतात. म्हातारपणाची व्यवस्था अगोदर
करणे खूप महत्वाचे आहे. श्री तुकाराम महाराज म्हाता-या माणसाची अवस्था काय
असते ते सांगतात. “म्हातारपणी थेटे पडसे खोकला । हात कपाळाला ।
लावुनि बसे ॥ खोबरियाची वाटी । जाले असे मुख । गळतसे नाक । श्लेष्मपुरी ॥ बोलो
जाता शब्द । न येचि हा नीट । गडगडी कंठ । कफ भारी ॥ सेजारी म्हणती । मरेना का मेला
। आणिला कांटाळा । येणे आम्हा ॥ तुका म्हणे आता । सांडूनि सर्व काम । स्मरा राम
राम । क्षणा क्षणा ॥“
या सर्व गोष्टीचा विचार केला तर श्री शंकराचार्य स्वामी महाराज
म्हातारपणाचे वर्णन करतात वृद्धापकाळात इतके भयंकर हाल असतात तरीही त्या व्यक्तीची
अशा सुटत नाही. काही तरी सतत खटपट करीत राहतो. वास्तविक पाहता आता खरा विश्रांतीचा
काळ असतो पण आयुष्यभर जे करीत आला त्याची सवय जात नाही. सारखे मुलांच्या संसारात
लक्ष घालतो त्यांना सल्ले देतो वास्तविक ते अनुभवाचे बोल असतात आणि नेमके
हेच त्या मुलांना आवडत नसते.चिड चीड सुरु होते. ”Genaration
Gap “ सुरु होते. मुले मग आई वडिलांना वृद्धाश्रमात
जाण्याचा सल्ला देवू लागतात. सासू सुनेचे झगडे बंद होत नाहीत.
नातवंडात जीव रमवावा असे वाटते पण त्या मुलांचे विश्व वेगळे असते आणि “
नटसम्राटचे “ जे झाले तेच होत असते याकरिता “आशा या परम दुखं, नैराश्य परम सुखं ||” हे भगवतातले वचन खरे आहे .
अध्यात्माची गोडी असेल तर या प्रतीकुलतेचे काहीही वाटत नाही. कुठल्याही प्रकारची
आशा आकांक्षा ठेवू नये व भगवंताच्या भजनात काळ कसा घालवता येईल ते पाहावे.म्हणजे
म्हातारपण सुद्धा आनंदात जाईल व अनुभवाची शिदोरी कामाला येईल .
कुरुते
गंगासागरगमनं व्रतपरिपालनमथवा दानम्।
ज्ञानविहिनःसर्वमतेन मुक्तिः न भवति जन्मशतेन||१७ ||
सब तीर्थ बार बार , गंगासागर एक
बार | अशी म्हण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. पण आता तसे नाही
रहिले ,“सब तीर्थ बार बार ,और
गंगासागर भी बार बार” | कारण पूर्वी गंगासागर
यथील कपिल मुनीचे मंदिर समुद्रात होते आत ते मंदिर खूप अलीकडे आणले आहे. जेथे गंगा
समुद्राला मिळते त्या तीर्थाला गंगासागर म्हणतात. या गंगासाराहून जवळच बांगला देश
आहे आणि तेथून सर्रास तस्करी होत असते. किंबहुना येथे बरेचसे लोक हे बंगला देशीच
आहेत, अवैध रित्या घुसलेले आहेत त्यांच्यावर कोणाचाही
कंट्रोल नाही. आम्ही त्यांची अरेरावी अनुभवली आहे. असो आदि शंकराचार्य स्वामी महाराज सांगतात
तुम्ही गंगासागरला गेलात तरीही मुक्त होऊ शकणार नाही कारण मुक्ती फक्त आणि
फक्त ज्ञानानेच मिळते इतर कोणत्याही साधनाने मोक्ष मिळत नाही हा श्रुतीचा सिद्धांत
आहे व ज्ञानापेक्षा या जगात काहीही पवित्र नाही असे भगवत गीता सांगते. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते | . श्रुती
माउली पण सांगते “ऋतेज्ञानात् न मुक्तिः ज्ञानादेव कैवल्यम् ||” ज्ञानाशिवाय इतर कोणत्याही साधनाने मुक्ती नाही फक्त ज्ञानानेच मुक्ती
मिळते. हा अबाधित सिद्धांत आहे.
ज्ञानेश्वरीमध्ये
फार छान संगितले आहे ,” ज्ञानेश्वरी अध्याय १२ मध्ये माउली
म्हणतात , “मोक्ष
देऊनि उदार । काशी होय कीर ।परी वेचावें लागें शरीर । तिये गांवीं ॥ १७३ ॥हिमवंतु
दोष खाये । परी जीविताची हानि होये ।तैसें शुचित्व नोहे । सज्जनाचें ॥ १७४
॥शुचित्वें शुचि गांग होये । आणि पापतापही जाये ।परी तेथें आहे । बुडणें एक ॥ १७५
॥खोलिये पारु नेणिजे । तरी भक्तीं न बुडिजे ।रोकडाचि लाहिजे।न मरतां
मोक्षु ॥१७६॥“
अनेक प्रकारचे
तीर्थ आहेत सप्त पुरी , चार धाम, बारा
योतीर्लिंग हे सर्व जरी तुम्ही फिरून आलात तरीही जर आत्मज्ञान झाले नाही तर काहीही
उपयोग नाही. हेमाडपंडिताने काही हजारवर व्रते सांगितली आहेत आणि हे व्रते जर
करायचे म्हटले तर आयुष्य पुरणार नाही
“नलगे तीर्थीचे भ्रमण। नलगे दंडन मुंडण। नलगे
पंचांगी साधना। तुम्ही आठवा मधुसूदना गा...।।“श्री संत एकनाथ महराज
वासुदेव या अभंगात सांगतात कि तीर्थ भ्रमण, दंडण मुंडण , पंचाग्नी साधन हे काहीही मुक्तीसाठी आवशक नाही. किंवा “ लेने को हरिनाम है, देने को अन्नदान। तरने को है
दीनता डूबने अभिमान “ असे म्हणतात, दानाचे वेगवेगळे प्रकार आहेत, अन्नदान,गोदान,भूदान,कांचनदान वस्त्रदान रक्तदान, गजदान, आणि
सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञानदान , या
वेगवेगळ्या प्रकारच्या दानाने फारतर पुण्य उत्पन्न होईल पण मुक्ती मिळणार
नाही कारण मुक्ती फक्त ज्ञानाने मिळते. ब्रह्म्स्वरुपाच्या अज्ञानामुळेच जगतभ्रम
होत असतो. व तो भ्रम त्याच्याच ज्ञानाने जात असतो दुसर्या कशानेही जात नाही. उदा.
रज्जूच्या अज्ञानाने सर्प भ्रम होतो व त्याच रज्जूच्या ज्ञानाने सर्प भ्रम जातो.
ज्ञानेश्वरीमध्ये माउली म्हणतात “ स्वप्नीच्या घाया| ओखद(औषध)
चेववी धनंजया| तेवी अज्ञान यया | ज्ञानची
खड्ग ||” स्वपांतील दुखाला जागे करणे हे औषध आहे .
प्रतीयोगीच्या आगमनाने अनुयोगी जात असतो. जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत अंधार
जाऊ शकत नाही तुम्ही कोणतेही कर्म करा काहीही उपयोग होत नाही. शेकडो जन्म जरी गेले
आणि आत्मज्ञान झाले नाही तर मुक्त होऊ शकत नाही. ( हा श्लोक सुबोधाचार्य रचित आहे
असेही मानले जाते. )म्हणून ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे श्रेयस्कर आहे.
सुर-मन्दिर-तरु-मूल- निवासः शय्या भूतलमजिनं वासः।
सर्व-परिग्रह-भोग-त्यागः कस्य सुखं न करोति विरागः ||१८ ||
भर्तृहरीच्या वैराग्य शतकामध्ये खालील श्लोक
आला आहे तो असा ..
भोगे रोगभयं कुले च्युतिभयं वित्ते
नृपालाद्भयं
मौने दैन्यभयं बले रिपुभयं रूपे जरायाभयम् ।
शास्त्रे वादिभयं गुणे खलभयं काये
कृतान्ताद्भयं
सर्वं वस्तु भयान्वितं भुवि नृणां
वैराग्यमेवाभयम् ।। ( वैराग्यशतकम् ३१ )
मनुष्याचा पाठीमागे भय
लागलेले आहे. अति भोग भोगणाऱ्या माणसाला रोग होतच असतो. जगत्तगूरू श्री तुकाराम
महाराज म्हणतात “ भोगे रोगा जोडोनिया दिले आणिका | अरुची ते हो का आता सकळापासुनी || “ उच्च कुलाला अध:पतनाचे भय
. भरपूर धन, पैसा असल्यावर इन्कम
ट्याक्सचे भय. धनाच्या मागे भागवतामध्ये पंधरा अनर्थ सांगितले आहेत. धनवान माणसाला
फार घमंड असतो व अशा माणसाकडे एखादे बहिरे, आंधळे, मतीमंद हटकून असते. “धनवंत एक बहिरट आंधळे ||तू.म.|| कधी कधी संपती खूप असते पण
संतती नसते पैसा असूनही सुख मिळत नाही.” तुका म्हणे धन | भाग्य अशाश्वत जाण ||” श्रीमंत माणसाला कायम
भीतीच्या छायेत जगावे लागते. कमी बोलणाऱ्या माणसाला दैन्य असते. बलवान माणसाला
हटकून शत्रूचे भय असते. सौंदर्यवान व्यक्तीला वृद्धत्वाचे भय असते. शास्त्र
पारंगताला वादाचे भय असते . गुणवानाला दुष्ट व्यक्तीचे भय असते. शरीरधारी म्हटले
म्हणजे काळाचे भय आलेच. तात्पर्य सर्व वस्तू भयग्रस्त आहेत फक्त वैरग्यच अभय आहे
म्हणजे विरक्त माणसाला कसलेच भय नसते.
वरील विषयाला अनुसरून
सुरेश्वाराचार्य सांगतात कि, मानसाला जगण्यासाठी असे काही फार लागत नाही निसर्गासी
जुळवून घेतले तर काहीही अडचण येत नाही . पण माणूस नैसर्गिक राहू इच्छित नाही .
विषयाची आसक्ती त्याला तसे राहू देत नाही. एखाद्या सुंदर झाद्खाली पण तो राहू शकतो
“ आचार्य म्हतात ,”करतलभिक्षा तरुतल वास:
किंवा “मूलं तरो:
केवलमाश्रयन्त: । पाणिद्वयं
भोक्तुममत्रयन्त:।
कन्थामिव श्रीमपि कुत्सयन्त: । कौपीनवन्त: खलु भाग्यवन्त:।।“ झाडाखाली राहावे आणि हातावरच्या तळव्यावर
जेव्हडी भिक्षा मिळेल तेवढी खावी आणि आनंदात राहावे, अशी
जयची वृत्ती आहे तो अल्प्वस्त्राधारी(कौपिन) तो सुखी आहे. जवळच एखादे देवालय असावे
तेथे भगवंताच्या चिंतनात राहावे यासारखे सुख नाही. हे त्यागी जीवन खरे सुखी असते व
त्यागानेच अमृतप्राप्ती होते तात्पर्य ज्ञान प्राप्त होते “ त्यागेन एके अमृतत्वम् आनशुः' (कैवल्य उ. १/२), “ त्यागानेच खरे सुख मिळत असते.
वृक्षाने फळे द्यायचे बंद केले काय ? नदीने वाहण्याचे
बंद केले काय ?पर्वतात गुहा नाहोत काय ? हे सर्व आहे तरीही श्रीमंत लोकांची लाचारी का करतात ? असे श्री शुकाचार्य भागवतात म्हणतात , याचे
एकमेव कारण वैरग्य नाही.
आजीनम वास ...म्हणजे पांघरण्यासाठी मृगाजिन नाही काय ? तात्पर्य परीग्रह नसावा आपल्याजवळ असणारी वस्तू भयाला कारण असतात. म्हणून
त्यांचा त्याग करावा म्हणजे चिंता राहणार नाही. नाथसंप्रदायी मच्छिंद्रनाथ जेव्हा
स्त्री राज्यातून गोरक्षनाथांबरोबर परत निघाले तेव्हा किलोतळेने त्यांच्याबरोबर एक
सोन्याची वीट दिली होती तेव्हा ते गोरोक्षनाथांना सारखे विचारायचे “ यहा डर तो नही ?” गोरक्षनाथांच्या लक्षात आले आणि त्यांनी मच्छिंद्रनाथांच्या न कळत
ती सोन्याची वीट फेकून दिली व म्हणाले “डर पीछे राह गया |” तात्पर्य संग्रह माणसाला भय उत्पन्न करतो . आणि त्याग सुख देतो.
माणसाला वाटते मला काय कमी आहे ! मला कोणाची आवशकता नाही मी धनवान आहे , मी सत्तावन आहे , मी सशक्त आहे पण
मित्रांनो हे काळाच्या ओघात सर्व नष्ट होणारे आहे . खरे वैराग्य हे निर्भय असते पण
दिखावू वैरग्य हे टिकवू नसते. तो दांभिकपणा असतो. ज्याच्याजवळ काहीच संग्रह नाही
असा माणूस निर्भय असतो त्याच्याकडून कोणीच काहीही हिरवून घेऊ शकत नाही कारण
त्याच्याजवळ भौतिक असे काहीच नसते. थोडक्यात त्याला कोणाचेही तादात्म्य नसते.
माउलींनी संन्यासाची व्याख्या फार छान केली आहे “मी माझे ऐसी आठवण | विसरले जायचे अंत:कारण| पार्था तो संन्यासी जाण | निरंतर || “ ज्याच्या अंत:करणात मी आणि
माझे (अहं आणि मम )राहिले नाही असा वैराग्यवान महात्मा सुखी आहे तोच खरा सन्यासी
आहे “ वारी भगवा झाला नामे |अंतरी वश्य केला कामे | ऐसा नसावा संन्यासी | जो का परमार्थाचा
द्वेषी || असे संत श्री मुक्ताबाईंनी स्पष्ट
सांगितले आहे.” कस्य सुखं न करोति विरागः “ तात्पर्य खरे वैराग्य कोणाला सुखी करणार नाही ?
योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा
संगविहीनः।
यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दति एव ॥१९ ॥
ज्याचे मन परब्रह्मामध्ये स्थित आहे म्हणजे थोडक्यात जो स्थितप्रज्ञ आहे ,ज्याच्या दृष्टीमध्ये जगत न दिसता जगदीश्वर दिसतो स्वभिन्न कोणीच वाटत नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला | रिता ठाव नाही उरला | आजी म्या दृष्टीने पहिला | विठ्ठलची विठ्ठलची|| तु.म.|| वेदांतामध्ये एक प्रसिध्द वाद आहे त्याचे नाव दृष्टी सृष्टी वाद व सृष्टी दृष्टी वाद . जसी दृष्टी असेल तसी सृष्टी दिसते. व एक वाद असा कि जसी सृष्टी तसी दृष्टी . दृष्टीत जर देव असेल तर संपूर्ण सृष्टी देवस्वरूप दिसते. तसे ज्याचे अंतकरण भगवदमय झाले त्याला विश्व हे देव वाटते. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात ,” ऐसा ज्याचा अनुभव | विश्व देव सत्यत्वे ||१||देव तयाजवळी वसे | पाप नासे दरुशने ||२|| “ विश्व सत्य नाही तर ते भगवद्रूप आहे हि प्रतीभ अनुभूती ज्याला आली असा महात्मा योगसाधनेत रममाण होवो किंवा वेगवेगळ्या भौतिक विषयात रममाण होवो त्याचे काहीही नुकसान होत नाही “ मग तु राहे भलते ठायी | जनी वाणी खाटे भुई || तु. म.|| “ तो महात्मा व्यावहारात आणि परमार्थात कोठेही असो त्याची स्थिती भंग पावत नाही हे विशेष . हिंदू श्रुती स्मृती ग्रंथामध्ये अशा या ब्राह्मी स्थितीचे अलोकिक वर्णन केलेले आहे. एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति।
स्थित्वाऽस्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति।।२-७२।। अर्जुना ! हि ब्राह्मी स्थिती आहे. माउली म्हणतात “ हे ब्राह्मी स्थिती नी:सीम | जे अनुभविता निष्काम | ते पावले परब्रहम |अनायासे ||२/७२/३६८|| “ या स्थितीला जो प्राप्त झालेला आहे तो सहज निष्काम असतो. असा महात्मा “जन विजन झाले आम्हा | विठ्ठल नामाप्रमाणे ||१|| या अनुभूतीमध्ये रममाण झालेला असतो . अशा महत्म्याला वेद सुद्धा मर्यादा घालू शकत नाही . याचा अर्थ वेद काही त्याला स्वैराचाराचा परवाना देतो असे नाही. अनेक ग्रंथात सांगितले आहे कि हा महात्मा विधी निषेधाच्या पलीकडे गेलेला असतो त्यामुळे “ को विधी : को निषेध: || माउली अनूभावामृत या ग्रंथात सांगतात “ स्वैर झाला समाधी | स्वेछाची झाला विधी ||... वेदाने सिध्द पुरुषाला दिलेला हा एक स्वतंत्र अधिकार आहे .
डॉक्टर एखाद्या पेशंटचे
ऑपरेशन करीत असतांना
तो
पेशंट दगावला तर
डॉक्टरवर
काही खुनाचा गुन्हा दाखल करीत नाहीत . कारण त्या डॉक्टरचा उद्देश स्वच्छ असतो. किंवा सर्वोच्च न्यायालात ज्याला फाशीची
शिक्षा झालेली आहे अशा आरोपीला सुद्धा राष्ट्रपती ती शिक्षा कमी करू शकतात. हा
त्यांचा एक विशेषाधिकार आहे . तसे या महात्म्याचे आहे . त्याला देह तादात्म्य
नसते. त्यामुळे कदाचित त्याच्याकडून प्रारब्धवशात चुकून जरी काही निशिध्द कर्म
जरी घडले तरी त्याला दोष लागत नाही. भगवदगीतेमध्ये अध्याय २-३८ मध्ये सांगितले आहे
कि” सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो
युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥३८॥“ सुखी संतोषा न यावे | दु:खी विषादा न भजावे | आणि लाभालाभ न धरावे | मनामाजी ||.. याप्रमाणे जर अर्जुना तुझी
वृत्ती झाली तर तुला युध्द करूनही पाप लागणार नाही . हा खरा गीतेचा संदेश आहे पण !
लोक सोयीस्कर दुर्लक्ष करतात.
संत सम्राट श्री ज्ञानेश्वर
महाराज म्हणतात “ तयाचेनि हातू | घडे त्रैलोक्याचा घातु | परी तेणे केला हे मातु | बोलू नये ||ज्ञा” कारण त्याचे देह तादात्म्य संपलेले असते. व तो देहला धरून
होणार्या आचरणाच्या अधीन नसतो किंबहुन त्याला त्याचे भानही नसते. “तुका म्हणे मुक्ती पर्णिली
नवरी | आता चारी दिवस खेळीमेळी ||” हि त्याची अलोकिक स्थिती
असते. त्याचे हे कार्य जगाच्या उद्धाकाराकरीताच असते. तो महात्मा आत्मनंदांतच
रममाण असतो. म्हणूनच श्री नित्यानंदाचर्य सांगतात तोच महत्मा केवळ आत्मनंद भोगतो.
तोच आनंद मिळवतो किंबहुना तो आनंदस्वरूपच
असतो यात शंका नाही.
भगवद्गीता किञ्चिदधीता गंगा- जल-लव-कणिका-पीता।
सकृदपि येन मुरारिसमर्चा तस्य यमः किं कुरुते चर्चाम् ॥२०॥
मनुष्य जीवन जर सफल व्हावे असे वाटत असेल तर
तीन प्रकारचे साधने महत्वाचे आहेत ते म्हणजे १)गीता-अभ्यास २) गंगा सेवन (सत्संग
आणि अनुग्रह )३) मुरारीची उपासना म्हणजेच भगवंताची भक्ती . या तीन साधनाने
मनुष्याला आपले अंतिम ध्येय म्हणजेच मोक्ष प्राप्त करून घेता येतो .
वेदांताची प्रस्थानत्रयी म्हणजे भगवदगीता , ब्रह्मसूत्र , दशोपनिषदे हे होत. यावर भाष्य केले तरच आचार्य पदवी मिळत असे.
त्यापैकी भगदगीता हि उपनिषदांचे सार आहे. माउली
ज्ञानोबाराय म्हणतात ,” बाप बाप ग्रंथ गीता | जी वेदा प्रतीपाद्य देवता | जो श्रीकृष्ण वक्ता | इये ग्रंथीचा ||”. वेदाचे उणे गीतेने भरून
काढले व गीतेचे उणे ज्ञानेश्वरीने भरून काढले असे म्हटले जाते ते अगदी योग्य आहे.
वेद वाचण्याचा , ऐकण्याचा सर्वांना अधिकार
नव्हता आताही काही प्रमाणात तो
अधिकार नाही. “ वेदु कृपण जाहला| जे कानी त्रीवार्गाचीये लागला | स्त्रीशुद्रसी अबोला अद्यापि ठेला ||”वेद सर्व ज्ञानाने संपन्न आहे हि गोष्ट खरी
आहे पण तो सर्वांना सुसेव्य नाही म्हणून वेदातील तत्वज्ञान गीतेत आले व गीतेतील
तत्वज्ञान ज्ञानेश्वरीत आले, आणि आणखी सुलभ झाले . “माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ
मूर्त । यालागि त्रिवेणी हे उचित । फावली बापा ।।११-७।।“ गीता हि सरस्वती आहे आणि ती गुप्त आहे ज्ञान
हीच सरस्वती आहे. जसा वेद त्रिकांडात्मक आहे. तसीच गीता सुद्धा आहे , त्यात कर्म , उपासना , ज्ञान असे तिन्ही भाग आहेत .
मनुष्याने जीवनात भगवद गीता अध्यन केलीच पाहिजे कारण कसे जगावे
हे गीता सांगते आणि कसे मरावे हे भागवत सांगते. कर्म करावे पण कर्मफलाची आसक्ती
धरू नये म्हणजे दु:ख होत नाही हे गीता सांगते. आणि ज्ञानाची महती गीता सांगते
ज्ञानापेक्षा या जगात काहीही पवित्र नाही म्हणून मनुष्याने ज्ञान मिळवण्याचा
प्रयत्न केला पाहिजे . योगाने चित्ताची स्थिरता होते , कर्माने चित्तशुद्धी होते व
ज्ञानाने मोक्ष होतो . माउली सांगतात कि गीतेत मुख्य काय सांगितले ? “येथ अविद्या नाशु हे स्थळ | तेणे मोक्षोपादन फळ | या दोही केवळ | साधन ज्ञान || “ म्हणून प्रत्येक मनुष्याने गीतेचे किंचित का
होईना पण ज्ञान प्राप्त करून घेतलेच पाहिजे आणि हे जर होत नसेल तर
त्या जीवनात काय अर्थ आहे ?
“हम उस देशके बासी है , जिस देशमे गंगा बहती है |” हे जुन्या जमान्यातील गाणे
वाजले कि उर अभिमानाने भरून यायचा प्रत्येक भारतीयांचे अंतिम ध्येय असते कि आपल्या
अंत:काळी गंगाजल आपल्या मुलाने आपल्या मुखात टाकावे इतके गंगेचे महत्व आहे . “वाचे
म्हणता गंगा गंगा | सकळ पापे जाती भंगा || तु.म. ||” एवढे गंगेचे महात्म्य आहे जी गंगा इक्षवाकू
वंशातील अनेक पिढ्याच्या प्रयत्नाने आणि शेवटी भगीरथ प्रयत्नाने स्वर्गीय गंगा या
अवनितलावर आली .” कां फेडीत पाप ताप । पोखित तीरींचे पादप ।
समुद्रा जाय आप । गंगेचें जैसें ॥ज्ञाने.१६.३.१९९॥“ जगाचे पाप ताप,निवारण करीत आणि तीरावरील झाडे झुडपे पशु पक्षी
व सर्व
सजीवांना पोषित हि गंगा आपल्या मूळ स्वरूपाकडे म्हणजेच समुद्राकडे जाते.
हि गंगा साक्षात कैलास्पतींनी आपल्या मस्तकावर धारण केली आहे. आपण
सुध्द खरे तर हि मस्तकावरच धारण करायची आहे म्हणजेच ज्ञानरूप गंगा हि
स्वर्गीयच आहे , ज्याप्रमाणे सरस्वती गुप्त आहे तसे ज्ञान
सुद्धा गुप्त आहे. लवमात्र ज्ञान जरी प्राप्त झाले तरी कृतकृत्यता प्राप्त होते.
आणि विशेष म्हणजे गंगेच्या किनारी ज्ञानप्रधानता आहे. एक विशेष असे पावित्र्य आहे.
मित्रांनो
मी जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तेव्हा तेथे मेलबर्नमध्ये होतो व तेथे “यारा
“नावाची विशाल अशी नदी आहे तिच्या किनार्याने आम्ही फिरायला गेलो तेव्हा गंगेचा
किनारी जी पवित्रता जी दिव्यता अनुभवला येते तो अनुभव येथे काहीच येत नाही.” गंगे
तुझ्या तीराला बहु गोड सुख वाटे ||” हि संतोक्ती किती सार्थ
आहे !
तिसरी
महत्वाची साधना म्हणजे मुरारी समर्चा क्रियते म्हणजे
भगवान श्रीकृष्णाची पूजा , अर्चना भक्ती करणे आणि सतत
त्याच्याविषयीच बोलणे. “सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्र्च दृढव्रताः | नमस्यन्तश्र्च मां भक्तया
नित्ययुक्ता उपासते || ९-१४ ||” सतत
भगवंताचे चिंतन ,कीर्तन करीत राहणे हेच श्रेयस्कर आहे .”
मुर” नावाचा रक्षस होता त्याला श्रीकृष्णाने मारले म्हणून त्याला मुरारी म्हणतात.
याचे अध्यात्मिक रूपक म्हणजे “ मूर म्हणजे अहंकार हा राक्षस आहे व भगवंताला
शरण गेले कि तो हा अहंकार मारून टाकतो म्हणजे नष्ट होतो. “ अहंकार गेला | तुका म्हणे देव झाला |” अहंकार निवृत्ती झाली आणि
ब्रह्मज्ञान झाले कि मग मात्र त्याला” यम” काहीही करू शकत नाही , त्याला यम वगैरे काहीच भय राहत नाही. कारण हे सर्व कल्पित आहे हे त्याला
कळते व आत्म्याचे अमरत्व आणि देहाचे नश्वरत्व अनुभवला
येते म्हणून त्याला कोणतेच भय राहत नाही.
पुनरपि जननं
पुनरपि मरणं , पुनरपि जननी जठरे शयनं |
इह संसारे बहु दुस्तारे कृपया परे पाही मुरारे || २१ ||
पुन्हा जन्म , पुन्हा मरण,पुन्हा मातेच्या जठरात शयन करणे अशा
प्रकारच्या पार करण्यास अति कठीण असलेल्या संसारापासून हे ! मुरारे ! तू आपल्या
असीम कृपेने माझे राक्ष कर .
जन्म मरणाचे चक्र जीवाच्या दृष्टीने कधीही
न थांबणारे आहे. आब्रह्मभुवना लोको पुनरावार्तीनो | भगवान श्रीकृष्ण भागवत गीत्मध्ये म्हणतात
,”अर्जुना अरे ब्रह्मलोकापासून ते या इहालोकापर्यंत सर्व येणारे आणि जाणारे
आहेत.” अविद्देत अडकलेला जीव तर जन-मरण
भोगीतच असतो आणि सगळ्यात भयंकर दु:ख असते. मदालसा आपल्या मुलांना पाळण्यातच उपदेश
करीत असे त्यात ती म्हणते ,” उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा । आलासी
कवण्या वाटां मातेचियां गर्भवासा ।
जो पंथ वोखटा रे पचलासी
कर्मकोठा । अविचार बुद्धि तुझी पुत्रराया अदटा ॥१॥
पयें दे मदालसा सोहं जो जो रे
बाळा । निजध्यानीं निज पा रे लक्ष लागो दे डोळा ।
निज तें तूं विसरलासी होसी
वरपडा काळा ॥२॥
नवमास कष्टलासी दहाव्यानें
प्रसुत झाली । येतांचि कर्मजाड तुझीमान अडकली ।
आकांतु ते जननीये दु:ख धाय
मोकली । स्मरे त्या हरिहरा ध्यायीं कृष्णमाउली ॥३॥
उपजोनि दुर्लभु रे मायबापा
झालासी । वाढविती थोर आशा थोर कष्टी सायासी ।
माझें माझें म्हणोनिया झणी वायां भुललासी । होणार जाणार रे
जाण नको गुंफ़ो भवपाशीं ॥४॥
हा देहो नाशिवंत मळमुत्राचा
बांधा । वरी चर्म घातलें रे कर्म किटकाचा सांधा | ।रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा
बांधा | स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा ॥५॥
गर्भवासाचे दु:ख किती भयंकर आहे च हे मदालसा
आपल्या बाळांना पाळण्यातच शिकवते. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हतात “*
किती वेळा जन्मा
यावों । किती व्हावें फ़जीत ॥१॥
म्हणऊनि जीव
भ्याला । शरण गेला विठोबासी ॥२॥
प्रारब्ध पाठी
गाढें । न सरे पुढें चालतां ॥३॥
तुका म्हणे
रोकडी हे । होती पाहें फ़जीती ॥४॥
विशेष म्हणजे जन्म असा सहजी होत नसतो तो वासनेमुळे होत असतो “ वासनेच्या
संगे जन्म घेणे लागे | तेची झाली अंगे हरिरूप ||” नाथ महाराज हरिपाठात हेच सांगतात
जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. त्या वासनेचे दोन प्रकार आहेत एक सद्वासना आणि दुसरी
असद्वासाना. पुराणात एक अप्रतिम उदहरण आहे ते म्हणजे “ जडभरत राजा हरणी गर्भा गेला
| घाला तो घातला वासनेने ||” जडभारत राजा तपस्वी होता सदाचरणी होता तरीही हरणाच्या
भूतदयेने तो त्याच्या ममत्वात गुंतला आणि त्याच वासनेने तो हरणाच्या गर्भाला गेला.
म्हणून संगतीने ममत्व आणि ममत्वाने वासनावृद्धी आणि अध:पतन हे ठरलेले असते. अगदी
नारदांना सुद्धा वासना निर्माण झाली आणि नारदाची नारदी झाली .
असदवासनेने अध:पतन होते तर सदवासनेने उद्धार होतो . देव माझा मी देवाचा
||तु म. || हि सद्वासना आहे यालाच शास्त्रात “ संवादी भ्रम “ म्हणतात. (पंचदशीमध्ये
विशेष विचार आहे ) थोडक्यात हे सर्व अज्ञानामुळे होत असते व ते अज्ञान गेले कि मग
सर्व दु:ख जाते. सद्गुरूला शरण गेले कि ते आपल्याला ब्रह्मज्ञान देतात व तद्वारे
अज्ञान जाते.
पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू म्हणजे संसार अशी श्रीमद शंकराचार्य यांनी
व्याख्या केली आहे पण संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजंनी सुंदर व्याख्या केली
आहे ते म्हणतात “अगा उपजणे आणि निमणे | हे
साचची जे का मानणे | तो जीवलोकु |मी म्हणे
संसारु हन|| “ किंवा नवल ऐके धनुर्धरा | कैसा वासनेचा संसारा| ज्ञा .
जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात “काम क्रोध सो संसार | जिसे सर भार चालावे
||” स हा संसार कधी जन्मरण रूपाने असतो , कधी वासनेच्या सुपाने असतो , कधी
अहंकाराच्या रूपाने असतो. आणि यातून पार होणे खरेच खूप अवघड असते. “ ब्र्हमादिका
पार नुल्घवे सामर्थे || “असा हा अवघड संसार आहे. म्हणून हे ! मुरारे ! कृपा करून
मला या संसारातून पार कर.
रथ्याचर्पट-विरचित- कन्थः
पुण्यापुण्य-विवर्जित- पन्थः।
योगी योगनियोजित चित्तः रमते
बालोन्मत्तवदेव ॥22॥
ज्या माहात्म्याला स्वरुपचे यथार्थ ज्ञान
झाले आहे आणि त्या आनंदात तो राहत आहे त्याला जगाचे भान राहत नाही “ निराकार वस्तू
कैसी अकरा आली | जेथे तेथे व्यापक माझी सद्गुरू माउली |” हि त्याची प्रतीभ असते.” ब्रह्म सत्य जगत मिथ्या “ हे त्याला पुरेपूर पटलेले असते त्यामुळे तो जगाची
पर्वा करीत नाही व लोकलाज , लोकनिंदा , स्तुती या गोष्टी सुद्धा त्याच्या दृष्टीने
गौण ठरतात . ब्रह्मानंद स्वामी एका पदात छान लिहितात “ मुझे तो काम ईश्वरसे जगात
रुठे तो रुठन दे ||” हा महात्मा जगाचा विचार करीत नाही कारण त्याला सर्वत्र
भगवंताची प्रतीती येत असते. आणि यापेक्षा कोणता लाभ मोठा आहे? विशेष म्हणजे त्याचे
देह तादात्म्य संपलेले असते मग त्या देहाचे हा चोचले पुर्वीतही नाही. श्रीमद भागवत
स्कंध ११ मध्ये “ भिक्षु गीता “ नावाचे एक प्रकरण आहे त्यामध्ये कदर्यू नावाच्या
एका ब्राह्मणाचे चरित्र आले आहे जो अगोदर अत्यंत कंजूस होता पण जेव्हा त्याची
श्रीमंती गेली आणि त्याला वैराग्य झाले व
तो संन्यासी बनला आणि तद्नंतर त्याची अवस्थाच बदलून गेली , देह तादात्म्य संपले
त्यावेळी लोकांनी त्याची केलेली निंदा , उपेक्षा याचे त्याला काहीही वाटले नाही मग
तो आपल्या मस्तीत राहू लागला.
बालवत, पिशाचवत , मृतवत अशा विविध अवस्था
महात्म्यांच्या असतात. असाच एखादा महात्मा पिशाचवत अवस्थेत वर्तन करीत असतो.
त्याला वाटते “ जगे अवज्ञाची करावी | संबंधी सोय न धरावी | ऐसी ऐसी जीवी | चाड बहु
||” मग तो महात्मा रस्त्यावर पडलेल्या
चिंध्यांची गोधडी , किंवा वल्कले किंवा वस्त्रविरहित अवस्थेत असतो पण तो बोधावर
पूर्णपणे जागा असतो अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर शुकाचार्यांचे देता येईल त्यांना
वस्त्राची कधी गरज भासली नाही . कारण त्यांना सर्वत्र ब्रह्म प्रतीती व
पूर्णत्वाची अनुभूती येत होती.
बालकाची जशी सहज अवस्था असते तशी
त्या महात्म्याची सहज अवस्था असते. “ साधो
सहज समाधी भली |” असे संत श्री कबीर महाराज म्हणतात. त्याला आता पाप पुण्य काहीही
राहिलेले नसते. “ तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप | लागो नेदी पाप पुण्य अंगा || “
पाप पुण्य त्यांच्या दृष्टीने मिथ्या ठरलेले असते एक कल्पना असते बाकी काही नाही
म्हणून “ को विधी को निषेध: ||” त्याला विधी निषेध राहिलेला नसतो. श्री तुकाराम
महाराज म्हणतात “ मग तू राहे भलते ठाई | जनी वनी खाठे भुई ||”मग तो महात्मा कोठेही
राहिला तरीही त्याला कोणताही प्रतिबंध राहिलेला नसतो. “ ब्रह्मानंदी लागली टाळी |
कोण देहाते संभाळी ||” यालाच जीवनमुक्ती म्हणतात. तुका म्हणे
मुक्ती परीणली नोवरी | आता चारी दिवस खेळीमेळी ||
कस्त्वं कोऽहं कुत आयातःका मे जननी को मे तातः ।
इति परिभावय सर्वमसारम्विश्वं
त्यक्त्वा स्वप्नविचारम् ॥२३॥
मनुष्य देह
का मिळाला आहे?
याचे प्रयोजन काय
आहे ?
असा कधी
आपल्याला प्रश्न पडतो का ? तर
असा प्रश्न आपल्याला कधीच पडत नाही. नरदेहाचेनी ज्ञाने | सद्चीदानंद पदवी घेणे | एवढा आदिकर नारायणे | कृपावालोकने दिधला || किंवा श्री तुकाराम महाराज म्हणतात देवे दिला देह भजना गोमाटा || देवाने हा
देह भजन, भक्ती करण्यासाठी दिला .
मनुष्य नरदेहाला का आला याचा विचार अपरोक्ष
अनुभूती या ग्रंथात आचार्य म्हतात “कोऽहं कथमिदं जातं को वै कर्ताऽस्य विद्यते ।उपादानं
किमस्तीह विचारः सोऽयमीदृशः “ ॥ १२॥ मी कोण आहे ? मला कोठे जायचे आहे ? या जगताचा
कर्ता कोण आहे ? या जगताचे उपदान कारण कोण आहे ? विशेष म्हणजे
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापासून या प्रश्नाचा उहापोह केलेला दिसतो .
या जगताला संत एक दीर्घ स्वप्न म्हणतात. , स्वपांतील पदार्थ जागृतीत आले कि मिथ्या
ठरतात. आपले आई वडील कोण आहेत विशेष म्हणजे प्रत्येक जन्मात वेगवेगळे आई वडील
आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात “ "कवणाचे मायबाप
कवणाचे गणगोत | मृगजलवत जाईल रया
|| " जगद्गुरू श्रीं तुकाराम महाराज म्हणतात “ मायबापे पिंड पाळीयेला माया | जन्म मरण जाया संतसंग || “ हे सर्व
आयुष्य स्वप्नवत समजून याचा त्याग करण्यास सांगितले आहे. कारण आत्महितासाठी सर्वस्वाचा त्याग केला तरी तो विहितच आहे.
तज्ञांनी वर्षानुवर्षे चिंतन करून “ मी कोण
आहे ? “ याचा विचार मांडला आहे एक प्रकारे ते त्यांचे महान संशोधनच आहे. मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर
त्यांनी शोधले आणि मी पृथ्वी,आप, तेज, वायू, आकाश यापैकी मी
कोणीच नाही. पंचप्राण , हा देह , पंच ज्ञानेंद्रिये , पंच कर्मेंद्रिये , हि
अष्टधा प्रकृती मी नसून मी तर सर्वव्यापक एकच असणारे ब्रह्म आहे “ अहम ब्रहमस्मी
“हे त्याचे उत्तर आहे. आणि हे फक्त ज्ञानानेच समजते.कर्माने नाही,कर्माने चित्तशुद्धी
होते व ज्ञानाने मुक्ती होते. ते ज्ञान सद्गुरूकडून च मिळते . एक ब्रह्म सत्य आहे
. तत्भिन्न सर्व मिथ्या म्हजे आभास मात्र आहे. म्हणून ते सार्व असार आहे असे समजून
त्याग करावा . कारण त्यागानेच अमृततत्व प्राप्त होते. जगद्गुरू श्री तुकाराम
महाराज म्हणतात “ याजसाठी वनांतरा | जातो सांडोनिया घरा || मझे दिठावेल प्रेम | बुद्धी होईल होल निष्काम ||”
मदालसा आपल्या मुलांना पाळण्यातच उपदेश
करीत होती ती त्यांना सांगायची बाला ,” अठरा भर वनस्पती फुली फळी वोळती | बावी
त्या पोखरणी नदी गंगा वाहती | ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती | ते सुख
सांडोनिया कासया योग सेविती ||” तात्पर्य एवढे
सर्व वैभव असूनही हे राजे लोक सुद्धा एकांतामध्ये
वनामध्ये का जातात ? तर त्याचे कारण असे आहे कि प्रपंचात सुख नाहीच खरे सुख
एकांतात व सत्संगतीत आहे. म्हणून जागृतीतील अनुभव स्वप्नविचाराप्रमाणे मिथ्या
समजावे मनात उद्भवणाऱ्या विकारांना विचाराने बाहेर काढावे आणि अंतर्मुख व्हावे.
हा
श्लोक श्री योगानंदाचार्यांचा आहे असे समजतात.